तरूणांसाठी आनंदाची बातमी... एसटी महामंडळात प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरीच्या संधी
टीएमटीच्या वातानुकूलित बसमध्ये शनिवारी तिकीट तपासणीदरम्यान दोन प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून प्रत्येकी ३०० रुपयांचा दंड आणि तिकिटाची रक्कम वसूल करण्यात आली. मानपाडा परिसरातील लॉकिम कंपनीजवळ एक महिला प्रवासी बसमध्ये चढली, तिने वडवली गावापर्यंत बसमधून विना तिकिट प्रवास केला होता. प्रवास करत असताना ती महिला तिकिट तपासणाऱ्या अधिकाऱ्याला विना तिकिट आढळली. टीएमटी प्रशासनाकडून विनातिकीट प्रवाशांवर वारंवार कारवाई केली जात आहे. अनेकदा विनातिकिट प्रवास करू नका, असं सांगूनही प्रवाशांचे अद्यापही डोळे उघडत नाहीयेत.
advertisement
ओतूर मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात, प्रशासनाकडे मागण्या करूनही सतत दुर्लक्ष
अनेक फुकटे प्रवासी गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकिट प्रवास करताना दिसत आहेत. प्रवासादरम्यान अनेकदा कंडक्टर देखील प्रवाशांना तिकिट काढूनच प्रवास करा, अशी माहिती देत असतो. पण तरीही देखील अनेक प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. दरम्यान, वातानुकूलित बसमध्ये पकडलेल्या प्रवाशाकडून ३०० रुपये दंड वसूल करण्यात येतो, तर सामान्य बसमध्ये २०० रुपये दंड घेतला जातो. शनिवारीच्या दिवशी मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल ३२ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. यावेळी काही प्रवाशांनी वेगवेगळ्या कारणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तपासणी अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम वसूल केली.