MSRTC Recruitment 2025 : तरूणांसाठी आनंदाची बातमी... एसटी महामंडळात प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरीच्या संधी

Last Updated:

MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 434 प्रशिक्षणार्थी पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

ST Bus Services
ST Bus Services
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 434 प्रशिक्षणार्थी पदे (Apprenticeship) या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. एसटी महामंडळामध्ये, कोकण विभागातील स्थानिक भूमीपूत्र आणि कोकणातील चाकरमान्यांना या भरतीच्या माध्यमातून नोकरीसाठी मोठी संधी मिळणार आहे. कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे, जाणून घेऊया...
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत एकूण 434 रिक्त पदांवर शिकाऊ उमेदवारांची मेगा भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन भरावा लागणार आहे. शिवाय, आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन नमुना अर्ज रत्नागिरी एसटी विभाग कार्यालयात दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करणे आवश्यक आहे, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.
advertisement
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी एसटी महामंडळामध्ये एक वर्षांचा प्रशिक्षण प्रशिक्षण कालावधी असणार आहे. यांत्रिक डिझेल 110, यांत्रिक मोटारगाडी 110, बीजतंत्री 60, पत्राकारागीर 44, सांधाता 25, कातारी 10, यंत्र कारागीर 10, रेफिजरेशन अँड एयर कडीशनिंग 5, साठा जोडारी 44, सुतार 4, रंगारी 10, शिवणकाम 2 या विविध पदांवर शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. नोकरीच्या ह्या जाहिरातीमध्ये, कोणतीही वयोमर्यादेची नोंद करण्यात आलेली नाही. अधिकाधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MSRTC Recruitment 2025 : तरूणांसाठी आनंदाची बातमी... एसटी महामंडळात प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरीच्या संधी
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement