पुढील काही दिवस सुरू राहणाऱ्या ट्रायल रनमध्ये एकूण 10 स्टेशन्सचा समावेश आहे. कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासरवडवली आणि गायमुख या स्टेशनदरम्यान मेट्रोची ट्रायल घेतली जाणार आहे. ठाण्यातील मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांना मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे जाताना मोठा फायदा होणार आहे. प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल.
advertisement
Bhandup Traffic: पूर्व आणि पश्चिम भांडुपचं मिलन होणार! पालिकेच्या प्रयत्नांनी सुटणार वाहतूक कोंडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ हा एकत्रित सुमारे 35 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. यावर एकूण 32 मेट्रो स्टेशन्स उभारली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या दोन्ही मेट्रो लेनवर दररोज 13 लाख 43 हजार प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे.
मेट्रोच्या डेपोसाठी मोघरपाडा येथे हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी मेट्रो 4, मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 चा डेपो असेल. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग असेल आहे. एकत्रित विचार केल्यास हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कशी असेल ठाणे मेट्रो?
ठाणे मेट्रोत बीईएमएलचे (BEML) 6 डब्यांचे ट्रेन सेट्स असतील. सध्या मेट्रो 2 अ आणि 7 वर अशाच पद्धतीची मेट्रो धावत आहे. गाडीत आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टीम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, ऑटोमॅटिक अग्निशमन प्रणाली, अडथळा शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली इत्यादी अत्याधुनिक सुविधा असतील.