Bhandup Traffic: पूर्व आणि पश्चिम भांडुपचं मिलन होणार! पालिकेच्या प्रयत्नांनी सुटणार वाहतूक कोंडी

Last Updated:

Bhandup Traffic: भांडुपमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करणाऱ्याना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड किंवा अंधेरी-गोरेगाव लिंक रोडने वळसा घालून जावं लागतं आहे.

Bhandup Traffic: पूर्व आणि पश्चिम भांडुपचं मिलन होणार! पालिकेच्या प्रयत्नांनी सुटणार वाहतूक कोंडी
Bhandup Traffic: पूर्व आणि पश्चिम भांडुपचं मिलन होणार! पालिकेच्या प्रयत्नांनी सुटणार वाहतूक कोंडी
मुंबई: महानगरी मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. विशेषत: दररोज सकाळी आणि संध्याकाळी पिकअवरमध्ये तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामध्ये भांडुपचा देखील समावेश आहे. भांडुप रेल्वे स्टेशनजवळ एलबीएस मार्ग ते वीर सावरकर मार्गादरम्यान रोज सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूककोंडी होते. वाहनचालकांना गोगलगायीप्रमाणे संथ गतीने वाहनं चालवावी लागतात. पण, आता वाहनचालकांची सुटका होणार आहे. शिवाय, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना देखील वाहनचालकांची गैरसोय होणार नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एलबीएस मार्ग ते वीर सावरकर मार्गादरम्यान 530 मीटर लांबीच्या ओव्हरब्रिजचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा पूल 2027 च्या सुरुवातीला पूर्ण होईल, असं नियोजन महापालिकेनं केलं आहे. हा पूल उभारण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर 2022 मध्येच निविदा मागवली होती.
advertisement
तयार केलेल्या आराखड्यानुसार, रेल्वे मार्गावरून जाणारा हा पूल पश्चिमेकडील भांडुप स्टेशनजवळून सुरू होईल आणि पूर्वेकडील मेनन कॉलेजजवळ उतरेल. सध्या पश्चिमेला खांब उभारण्याचं काम सुरू आहे. पुलाच्या पूर्वेकडे असलेली अतिक्रमणं आणि झाडं तोडण्यासाठी व मिठागरांच्या जमिनीच्या काही भागांच्या अधिग्रहणासाठी परवानग्या मिळवण्याचं काम सुरू आहे. भांडुपमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मार्ग किंवा अंधेरी-गोरेगाव लिंक रोड मार्गावरून वळसा घालून जावं लागतं आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळही वाढतो. ओव्हरब्रिज तयार झाल्यास ही समस्या देखील सुटणार आहे.
advertisement
कसा असेल ओव्हरब्रिज?
समोर आलेल्या माहितीनुसार, ओव्हरब्रिज एकूण लांबी 529.23 मीटर असेल. त्यापैकी पूर्वेकडील बाजू 233.50 मीटर आणि पश्चिमेकडील बाजू 207.30 मीटर असेल. पुलाच्या लांबीपैकी अंदाजे 89 मीटर पूल हा रेल्वे ट्रॅकवरून जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे 129.43 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhandup Traffic: पूर्व आणि पश्चिम भांडुपचं मिलन होणार! पालिकेच्या प्रयत्नांनी सुटणार वाहतूक कोंडी
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement