ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी लॉजवर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाईसाठी मोठा फौज फाटा घेऊन पोलीस गेले होते. मात्र तिथे ड्रग्स प्रकरणातील आरोपी नसून मटका बुकिंग व्यवसाय चालत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या हॉटेलचे दरवाजे तोडून ही कार्यवाही केली आहे.
यात ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गंगणेसह ड्रग्स प्रकरणात कारवाईची मागणी करणारे काँग्रेसचे अमोल कुथवळ, सचिन पाटील हे मटका बुकीचे मालक असल्याचे निष्पन्न झाले असून काँगेस पक्षाचे नेते अमोल कुतवळ, सचिन पाटील यांच्यासह अनेक बडे मासे गळाला लागले आहेत.
advertisement
या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर असा एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ३३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या कठोर भूमिकेचे दर्शन घडले आहे.