TRENDING:

Beed News: 'पायरीवरून बाजूला हो' म्हटल्याचा राग, गरीब वेटरला आपटून आपटून मारलं, बीडमधली संतापजनक घटनेचा VIDEO

Last Updated:

जखमी तरुण हा बीड तेलगाव सरस्वती विद्यालय इथं शिक्षण घेत एका हॉटेलवर वेटरच काम करत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून कष्ट करून शिक्षण घेतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होत नाहीये, त्याामुळे लोकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा सवाल नेहमी उपस्थितीत होत आहे. अशातच आता तेलगावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलवर वेटरला क्षुल्लक कारणावरून टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झााली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील तेलगाव तालुक्यात ही घटना घडली. एका हॉटेलमधील वेटरला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सागर विजय जाधव वेटरच नाव आहे.

[video width="854" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/beed-2026-03-8af435e6c8ab5fbec6ce32cbf49a3297.mp4"][/video]

तेलगाव इथं चौकामध्ये  त्रिमूर्ती ज्युस सेंटर आहे. सागर जाधव हा या ज्युस सेंटरमध्ये वेटरचं काम करतोय, रिकामे ग्लास जिन्यावरून खाली घेऊन येत असताना काही तरुण तिथे उभे होते. त्यावेळी सागरने पुढे जाण्यासाठी फक्त 'पायरीवरून बाजूला हो' असं बोलला. त्यामुळे या तरुणाला आपल्याला बाजूला हो असं का म्हटलं म्हणून सागर जाधवला थांबवलं आणि बाचाबाची सुरू केली.

advertisement

बाचाबाचीतून एका तरुणाने सागरला ज्युस सेंटरच्या बाहेर खेचलं आणि मारहाण केली. यावेळी या तरुणसोबत असलेल्या इतर तिघांनीही सागरला मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या सागर जाधव या   तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एक एकरमध्ये केली लिंबाची लागवड, 26 वर्षांनंतरही होतोय फायदा, 80 लाख निव्वळ नफा
सर्व पहा

जखमी तरुण हा बीड तेलगाव सरस्वती विद्यालय इथं शिक्षण घेत एका हॉटेलवर वेटरच काम करत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून कष्ट करून शिक्षण घेतोय. त्याला मारहाण झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून मारहाण करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: 'पायरीवरून बाजूला हो' म्हटल्याचा राग, गरीब वेटरला आपटून आपटून मारलं, बीडमधली संतापजनक घटनेचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल