TRENDING:

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणार? अखेर राजन साळवींनी मनातलं सगळंच सांगितलं,''पराभवाच्या वेदना...''

Last Updated:

Rajan Salvi : भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे म्हटले जात होते. भाजपच्या महाअधिवेशनात त्यांचा पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली. मात्र, राजन साळवी यांनी आज अखेर मौन सोडले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी :  शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. राजन साळवी हे भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे म्हटले जात होते. भाजपच्या महाअधिवेशनात त्यांचा पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली. मात्र, राजन साळवी यांनी आज अखेर मौन सोडले. राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना मनातलं सगळंच सांगितले.
ठाकरेंची साथ सोडणार? अखेर राजन साळवींनी मनातलं सगळंच सांगितलं,''पराभवाच्या वेदना...''
ठाकरेंची साथ सोडणार? अखेर राजन साळवींनी मनातलं सगळंच सांगितलं,''पराभवाच्या वेदना...''
advertisement

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. साळवी यांनी लांजा-राजापूर मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंकडून दुर्लक्ष होत असल्याने साळवींनी वेगळा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते.

advertisement

राजन साळवींनी काय म्हटले?

रत्नागिरीत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मनात पराभवाच्या वेदना आहेत. पण मी नाराज आहे, हे मला तुमच्याकडून समजत असल्याचे त्यांनी सांगितले. मी पक्ष सोडणार असल्याच्या सगळ्या अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. राजन साळवी यांनी म्हटले की, माझ्याविरोधात झालेल्या चौकशीबाबतचा निर्णय हा न्यायालयातून येणार आहे. मात्र, माझ्यावर, कुटुंबावर एसीबीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement

पक्षांतराच्या मुद्यावर पुढे बोलताना राजन साळवी यांनी म्हटले की, पिकल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणार. तसाच काहीसा प्रयत्न भाजप किंवा अन्य लोकांचा असू शकतो. मी सध्या माझ्या मतदार संघात कामं करत असून लोकांमध्ये आहे. मतदारसंघात काम करत असताना मी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांसोबत आतापर्यंत आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले.

advertisement

पराभवाला कोण कारणीभूत? शोध घ्या...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

माझ्या पराभवाला कोण कारणीभूत आहे. याचा शोध घेतला पाहिजे. विरोधी उमेदवाराला कोणी मदत केली याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे राजन साळवी यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणार? अखेर राजन साळवींनी मनातलं सगळंच सांगितलं,''पराभवाच्या वेदना...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल