विधानसभेत विजयी ठरलेल्या आमदारांचा निधी पालिका निवडणुकीत वापरा असा आदेस ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिला आहे.
खरं तर कोविडपासून महापालिका निवडणुका होई शकल्या नाहीयेत. त्यामुळे महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यात राज्यात सत्ता महायुतीची आहे. महायुतीचे सर्वाधिक आमदार देखील निवडुन आले आहेत. त्यामुळे महायुतीच्या कोणत्याही नगरसेवकाला प्रचारासाठी निधीची कमतरता भासण्याची शक्यता कमीच आहे. याच धर्तीवर उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांकडे निधीची कमतरता असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमदारांचा निधी महापालिका निवडणुकीत वापण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून नगरसेवकांना प्रचार करता येतील.
advertisement
उद्धव ठाकरेंनी नेत्यांना मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागांमध्ये तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. तसेच 18 निरीक्षकांना नेमून प्रत्येकी 12 प्रभागांची चाचपणी करा आणि त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.
हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडा
हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याचे म्हटले आहे. त्या लोकांमध्ये जाऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडा अशा सुचना ठाकरेंनी नगरसेवकांना दिला आहे. खंर तर आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिल्या आहेत.
तसेच भाजप पक्षासाठी बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं आहे. त्यामुळे आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका, पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा, असा कानमंत्रही ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिला आहे. त्याचसोबत ईव्हीएमचा मुद्दा आम्ही बघू पण तुम्ही संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात करा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा,अशा सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना केल्या आहेत.
