TRENDING:

वैभव नाईकांच्या आरोपाने सिंधुदुर्ग हादरलं, खळबळ उडवणारी फेसबुक पोस्ट, चर्चांना उधाण

Last Updated:

ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सध्या फेसबुक पोस्ट करण्याचा धडाका सुरू ठेवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिंधुदुर्ग : कुडाळ येथील हत्येच्या घटनेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण गरम असतानाच सावडाव येथील मारहाणीच्या घटनेनं सिंधुदुर्गात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सध्या फेसबुक पोस्ट करण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
News18
News18
advertisement

वैभव नाईक यांच्या आरोपाने वातारण चांगलेच गरम झाले आहे. आज पुन्हा एकदा निलेश राणे सोबत विजय इंगळे या युवकाचा फोटो पोस्ट केला आहे. काही दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरातील घंटा चोरणे, बिल्डिंग मटेरियल चोरणे, या चोऱ्यांचा छडा लावण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी कणकवली तालुक्यातील विजय इंगळे या युवकालाही घंटा चोरी प्रकरणात हात असल्याचा संशयावरून ताब्यात घेतले आहे. वैभव नाईक यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या निलेश राणे यांचा आणखी एक कार्यकर्ता मंदिरातील घंटा चोरी प्रकरणात अटक झाली झाली आहे.

advertisement

पोस्टनंतर मोठी खळबळ

विजय इंगळे निलेश राणे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची कुजबूज असल्याचे म्हटले आहे. तर या चोरी प्रकरणातील मुद्देमाल जप्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश उर्फ पक्या बिडवलकर अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी वैभव नाईक यांनी प्रश्नचिन्ह उभ करत बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती.22 हजारासाठी सिद्धीविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? असा सवालही माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता, त्यानंतर त्यांच्या पोस्टनंतर मोठी खळबळ उडाली होती.

advertisement

वैभव नाईकांचा सवाल

यावरून कोकणातील राजकीय वातावरण तापलं असून योगेश कदम यांनी पलटवार केला आहे. योगेश कदम यांनी, वैभव नाईक यांना उद्देशून, ते आता विरोधी पक्षात असून पराभूत उमेदवार आहेत. यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता ते अशी वक्तव्य करत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्र काय तर देशामध्ये देखील सर्वात शांत विभाग हा कोकण आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. वस्तुस्थिती जी आहे त्यावर त्यांनी बोलावं, असं आवाहन देखील कदम यांनी वैभव नाईक यांना केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वैभव नाईकांच्या आरोपाने सिंधुदुर्ग हादरलं, खळबळ उडवणारी फेसबुक पोस्ट, चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल