TRENDING:

टायगर अभी जिंदा है... हितेंद्र ठाकुरांची रॉयल एन्ट्री, घोषणांनी महापालिका दुमदुमली

Last Updated:

वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी संपन्न झाली. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील निवडून आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, प्रतिनिधी, वसई विरार : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक मोठी अटीतटीची झाली होती. दस्तुरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेऊन सुद्धा भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. जे ठाकरेंना मुंबईत जमले नाही ते मात्र वसई विरारमध्ये ठाकूरांनी करून दाखवलं.
हितेंद्र ठाकूर
हितेंद्र ठाकूर
advertisement

वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी संपन्न झाली. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांना ७१ मते मिळाली तर भाजपाच्या दर्शना त्रिपाठी कोटक यांना 44 मते मिळाली. यापूर्वी वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता होती. मात्र भाजपने एक आकडी संख्येवरून दोन आकडी संख्याबळ प्राप्त करून दखल घेण्यास भाग पाडले.

advertisement

बविआने काम केले, लोकांनी आमच्या कामाला पसंती दिली

लोकांनी गेल्या 35 वर्षात केलेल्या कामांना पसंती दिली असून विकास कामाच्या जोरावर आम्ही निवडून आलो आहोत आणि विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे नवनिर्वाचित महापौर

अजीव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या प्रचारापासून दूर राहिलेले प्रथम महापौर राजीव पाटील यांचे बंधू अजीव पाटील हे महापौर झाल्याने या ठिकाणी राजीव पाटील आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

advertisement

वसई विरारमध्ये कोणच्या पक्षाचे किती नगरसेवक?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरातील सगळेच खातील आवडीने, पारंपरिक पद्धतीने बनवा सोयाबीन चिली, रेसिपीचा Video
सर्व पहा

वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व कायम राहिले असून अजीव पाटील यांनी भाजपच्या दर्शना त्रिपाठी यांचा पराभव करत महापौरपद मिळवले. तर मार्शल लोपीस यांची निवड उपमहापौरपदी झाली. महापालिकेच्या ११५ जागांपैकी बविआला ७०, काँग्रेसला १, भाजपाला ४३, शिवसेनेला शिंदे गट १ जागा जिंकता आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टायगर अभी जिंदा है... हितेंद्र ठाकुरांची रॉयल एन्ट्री, घोषणांनी महापालिका दुमदुमली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल