रडण्याच्या वयात पाण्याशी केली दोस्ती
नऊ महिन्यांची ही चिमुरडी, खरेतर तिचे ते रडण्याचे आणि आईच्या कुशीत सुरक्षित राहण्याचे वय; पण या वयात ती रडणे विसरून पोहणे शिकत होती. वेदाचा मोठा भाऊ रुद्र शासकीय जलतरण तलावात दररोज सराव करतो आणि तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. रुद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे जेव्हा तलावावर येत असे, तेव्हा कंबरेवर बसून वेदा जलतरण तलावातील लोकांचे पोहणे कुतूहलाने पाहत असे.
advertisement
प्रशिक्षकांनी ओळखले हिचे कौशल्य
वेदाची पाण्याची ही आवड प्रशिक्षक महेश मिलके यांच्या लक्षात आली. त्यांनी एका दिवशी वेदाला पाण्यात सोडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती रडली नाही, उलट पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी थेट दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. आज जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना किंवा पाण्यात उतरताना तिचा अफाट आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. तिच्या या विक्रमी प्रवासाने तिची इच्छाशक्ती आणि आई-वडिलांचे समर्पण सिद्ध होते.
