TRENDING:

Jalgaon: लग्न लागलं, नववधूला आशीर्वाद देऊन घरी येत होते; पुलावर भयानक घडलं, लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळला

Last Updated:

पुलाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. वाहनाने धडक दिल्यानंतर दुचाकी ही थेट पुलावरून खाली कोसळली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाहून परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.  जळगाव-जामनेर रोडवरील स्पेक्ट्रम कंपनीजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव-जामनेर रोडवरील स्पेक्ट्रम कंपनीजवळ बुधवारी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुझफ्फर अली सय्यद बबन (वय ६०) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (वय ५५) दोन्ही राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव असं मयत झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. लग्न समारंभ आटोपून घरी परत येत असताना ही घटना घडली.

advertisement

पुलावरून दुचाकी खाली कोसळली

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये मुझफ्फर अली सैय्यद बबन हे आपले पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मसाला विक्री करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज बुधवारी २५ मार्च रोजी त्यांचे चुलत भावाच्या मुलीचं लग्न असल्याकारणामुळे ते आपल्या पत्नी ताहेराबी यांच्यासोबत स्कुटी क्रमांक (एमएच १९ इजे ३८९८) जळगाव येथून फर्दापूर इथं गेले होते. लग्न आटोक्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव जवळील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. वाहनाने धडक दिल्यानंतर स्कुटी  ही थेट पुलावरून खाली कोसळली.

advertisement

या भीषण अपघातात मुझफ्फर अली सय्यद बबन आणि ताहेराबी मुजफ्फर अली हे गंभीररीत्या जखमी झाले होते. स्थानिकांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. पण, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता दोघांना मयत घोषित केलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यांच्या पश्चात दोन मुलं सोना एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: लग्न लागलं, नववधूला आशीर्वाद देऊन घरी येत होते; पुलावर भयानक घडलं, लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल