खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून विरारचं नाव द्वारकाधीश करावं अशी मागणी जोर धरते आहे. या संबंधीत बॅनर देखील शहरभर झळकले होते. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर विरार रेल्वे स्थानकाला द्वारकाधीश नाव द्या अशी मागणी उत्तर भारतीयांनी केली आहे. तर मराठी माणसांनी विरार रेल्वे स्थानकाच नाव जीवदानी रेल्वे स्थानक करा अशी ही मागणी केली आहे.
advertisement
निवडणुकीची धामधूम सुरू असताना वसई विरारमध्ये उत्तर भारतीय नागरिकांनी विरार रेल्वे स्थानकाच नाव द्वारकाधीश नगरी करा अशी मागणी केली आहे.विरारमध्ये द्वारकाधीश मंदीर स्थापन झाले आहे.त्यामुळे विरार रेल्वे स्थानकाच नाव सुद्धा द्वारकाधीश नगरी करा अशी मागणी करण्यात आली आहे. जर उत्तर प्रदेशामधील इलाहाबादच नाव प्रयागराज करण्यात आलं आहे, तसंच विरारचं द्वारकाधीशनगरी नाव ठेवलं जर रोजगार वाढेल, जस प्रयागराज, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर बदलले असल्यामुळे विरार रेल्वे स्थानकाच नाव द्वारकाधीश नगरी ठेवलं पाहिजे अशी मागणी उत्तर भारतीयांनी केली आहे.
एकीकडे उत्तर भारतीयांनी द्वारकाधीशनगरी नावाची मागणी तर दुसरीकडे विरारच्या स्थानिकांनी जीवदानी माता आमची ग्रामदैवत आहे.तसेच द्वारकाधीश मंदिराआधी जीवदानी मातेच आपल्या इथे मंदीर आहे. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही त्याच मातेची पूजा करत आलो आहे.त्यामु्ळे विरारचे नाव जीवदानी माता ठेवावे,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान या मुद्यावरून निवडणुकीत राजकारण ही पेटण्याची शक्यता आहे. असे असताना आगामी काळात विरारचे नाव जर बदलले गेले, तर ते नेमते काय ठेवले जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
