कांद्याच्या दरात तेजी, कपाशी, तूर आणि सोयाबीनला किती मिळाला शुक्रवारी भाव? Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
2 जानेवारी शुक्रवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये विविध पिकांच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळालं. कपाशीचे दर स्थिर राहिले असले, तरी कांद्याच्या दरात तेजी नोंदवली गेली आहे.
अमरावती : 2 जानेवारी शुक्रवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये विविध पिकांच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळालं. कपाशीचे दर स्थिर राहिले असले, तरी कांद्याच्या दरात तेजी नोंदवली गेली आहे. दुसरीकडे सोयाबीनचे दर पुन्हा घसरले असून तुरीच्या दरातही किंचित घट दिसून आली आहे. तसेच आवक देखील कमी अधिक होत आहे. राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालांची आवक किती झाली? आणि भाव किती मिळाला? पाहुयात.
कपाशीचे दर स्थिर
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 19 हजार 091 क्विंटल कपाशीची आवक झाली. सर्वाधिक आवक ही वर्धा मार्केटमध्ये झाली. वर्धा मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 हजार 525 क्विंटल कपाशीला कमीत कमी 7469 ते जास्तीत जास्त 8010 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या मार्केटमध्ये कपाशीला 8010 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेला सर्वाधिक दर आज स्थिर आहे.
advertisement
Success Story : दिल्लीत लोकांची फेव्हरेट डिश, जालन्याच्या शेतकऱ्याने केली शेती, लाखांचा निव्वळ फायदा
कांद्याच्या दरात तेजी
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 2 लाख 72 हजार 339 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 91 हजार 494 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 493 ते जास्तीत जास्त 1939 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 100 ते सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनचे दर पुन्हा घसरले
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 54 हजार 509 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यातील लातूर मार्केटमध्ये 16 हजार 605 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीतकमी 4226 ते जास्तीत जास्त 4946 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये सोयाबीनला 5328 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरातही घट झाल्याचं दिसून येत आहे.
advertisement
तुरीच्या दरात किंचित घट
view commentsआज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 13 हजार 706 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 3 हजार 272 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी पांढऱ्या तुरीला 5000 ते 7560 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आलेल्या 2 क्विंटल काळ्या तुरीला 8400 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज किंचित घट बघायला मिळत आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 9:03 PM IST









