Success Story : दिल्लीत लोकांची फेव्हरेट डिश, जालन्याच्या शेतकऱ्याने केली शेती, लाखांचा निव्वळ फायदा
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी गजानन गिराम यांनी एक एकरात राजमा शेती यशस्वी केली आहे. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
जालना : पारंपरिक पिकांमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी नाविन्यपूर्ण पिके घेत आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकरी राजमा शेती प्राधान्याने करत आहेत. सिंधीकाळेगाव येथील शेतकरी गजानन गिराम यांनी एक एकरात राजमा शेती यशस्वी केली आहे. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. पाहुयात कशी केली जाते राजमा शेती.
राजमा हे उत्तर भारतात घेतलं जाणारं पीक आहे. थंड हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे येते. प्रयोग म्हणून शेतकरी यांची लागवड करतात. असाच प्रयोग गजानन गिराम यांनी केला आहे. परतुर येथून त्यांनी ब्राझीलवा नावाचे वाण विकत घेतलं. दोन महिन्यांपूर्वी 30 किलो बियाणांची एक एकरात पेरणी केली आहे.
advertisement
सध्या हे पीक फुल अवस्थेत आहे. या पिकाला एकदा डवरणी, एकदा खुरपणी आणि एक वेळी खत दिलं आहे. आतापर्यंत दोन वेळा पाणी दिलं आहे. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. याला 7 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. यामुळे हे पिक परवडते. एकरी एक लाख रुपये उत्पन्न या पिकातून मिळू शकते, असा विश्वास शेतकरी गजानन गिराम यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, गिराम यांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची शेतकरी वर्गात चर्चा आहे. यामुळे ही राजमा शेती पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतात भेट देत आहेत. मराठवाड्यात रबी पिकांना पर्यायी म्हणून हे नवं पीक पुढे येत असल्याचं पहायला मिळत आहे.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 6:22 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : दिल्लीत लोकांची फेव्हरेट डिश, जालन्याच्या शेतकऱ्याने केली शेती, लाखांचा निव्वळ फायदा









