सुरेश विश्वासराव यांनी 1989 मध्ये मानिवली गावातील ओसाड जागेत हे फार्महाऊस उभारले. फार्महाऊस च्या गेट पासून प्रवेश केल्यास ते स्वयंपाक घर एकही नोकर , माळी किंवा आर्किटेक्ट भेटणार नाही.स्वतःच्या कलेने आणि बुद्धिमतेने तयार केलेले हे वैभव मनाला ताज करण्याचा अनुभव देऊन जाते.मुख्य म्हणजे इथे लहान मुलांच्या औषधापासून ते पूजेच्या साहित्य पर्यंतच्या सर्व वनस्पती झाडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.असे हे निसर्गरम्य वातावरणातील आणि कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता 30 ते 35 वर्षांपासून उभारण्यात आलेले विश्वासराव फार्महाऊस आहे.
advertisement
हे सुरेश विश्वासराव, वय वर्षे अवघे 76. तेथील सर्व व्यवस्था ते स्वतः जातीने पाहतात, जेवण लाजवाब, वेगवेगळ्या साईजचे रुम्स, रुमची रोजची साफसफाई, झाडांना पाणी, कटिंग, पाळीव पक्षांचं खाणं, त्यांची जोपासना, पोहण्याच्या तलावातील पाण्याची नित्यनेमाने साफसफाई, व्हीजीटर्स शी प्रेमाने वागणूक, स्वतः चं कुटुंब, मुलाचं कुटुंब आणि भांडूपला रहाणाऱ्या विवाहित मुलीच्या कुटुंबीयांचा सर्वोतोपरी सहाय्य अशा घरगुती वातावरणात, निसर्गाच्या नयनरम्य सान्निध्यात प्रदुषणमुक्त अडिच एकर मध्ये वसलेलं हे फार्महाऊस खरोखर मनाला ताजं करण्याचा अनुभव देवून जातं.
मुंबईच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडंसं आडबाजूला असलेलं तरीही मुंबई पासून जवळच असलेले हे फार्महाऊस.इथे आल्यानंतर लाकडापासून त्यांनी स्वतःच्या हस्तकेलेने बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात.तसेच विश्वासराव शांत असणाऱ्या मनाला हमखास बोलायला लावतील अशी झाडांची गंमत बनवली आहे.सुरेश विश्वासराव आणि छोट कुटुंब या सर्वांच्या कष्टाने आणि मेहनतीने हे सर्व आज उभे आहे.एकवेळ अशी जागा होती जिथे पाणी ,लाईट,रस्ता कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. कोणीही जाऊन बघत नव्हते.आज विश्वासराव कुटुंबाच्या मेहनतीला यश मिळून त्या जागेत नंदनवन झाल्याचे दिसत आहे.