वाल्मिक कराड सातत्याने जामीनासाठी प्रयत्न करत आहे. आधी सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली असतानाच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
संपूर्ण प्रकरणाबाबत नवे खुलासे होणार का?
आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार…अशा आशयाची पोस्ट सुशील कराडने आपल्या सोशल मीडिया खात्यावर टाकली आहे. या पोस्टमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून संपूर्ण प्रकरणाबाबत नवे खुलासे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा महादेव मुंडे प्रकरण, यापैकी नेमक्या कोणत्या गुन्ह्याबाबत सुशील कराड काय बोलणार याबाबत सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
वाल्मिकच्या लेकाची फेसबुक पोस्ट व्हायरल
वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असून तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. न्यायालयाने जामीन नाकारताना गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची दिशा आणि पुराव्यांची शक्यता लक्षात घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरोपीस तात्पुरता दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. दरम्यान, सुशील कराडच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. आता वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आज त्याच्या मुलाने केलेली ही फेसबुक पोस्ट केली आहे.
सुशील कराड काय खुलासा करणार?
या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या असून, सुशील कराडकडून कोणते महत्त्वाचे खुलासे होतात का? याकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. आगामी काळात या प्रकरणात नवे पुरावे समोर येतात का? आणि तपासाची दिशा बदलते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि सुशील कराडच्या पोस्टनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
हे ही वाचा :
