दारुच्या नशेत महिलेवर तलवारीने वार, महिलेचा मृत्यू
जुन्या वादाच्या कारणातून मद्यधुंद व्यक्तीने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यावर तलवारीने तीन ते चार घाव घालून तिला यमसदनी पाठविले. ही घटना वर्ध्यातील इतवारा बाजार परिसरात घडली. मरियम शाह (60) रा. इतवारा असं मृत महिलेचे नाव आहे. आरोपी सचिन कांबळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध आहे. शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यातच मृत मरियमचा पती महेबूब उर्फ पाडप्या हा देखील गुन्हेगारी वृत्तीचा असून गांजा विक्रीच्या गुन्ह्याची नोंद त्याच्याविरुद्ध असल्याची माहिती आहे.
advertisement
वर्धा जिल्ह्यातील ही 10 पर्यटनाची ठिकाणे पाहिलीत का? एकदा नक्की द्या भेट
उधारीच्या वादातून दारु विक्रेत्याची हत्या, मृतदेह फेकला नदीत; 9 जणांना अटक
वर्ध्याच्या पुलगाव इथं दारूविक्री च्या उधारीच्या पैशातून झालेल्या वादात दारू विक्रेत्याची हत्या करून मृतदेह घुईखेड परिसरातील चंद्रभागा नदीपात्रात फेकून दिला. पुलगाव पोलिसांनी हत्या प्रकरणात नऊ आरोपीना अटक केली. अकबर अली जब्बार अली (32) रा. लिंगुफैल पुलगाव असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी अनिकेत वाघाडे, पूनम इरपाचे, आकाश कोडापे,गौरव उईके, रुपेश कावरे, स्वाती कावरे, अभय भागडकर, किसन राऊत, सुदाम काकडे, सर्व राहणार लिंगुफैल यांना अटक केली आहे.
गावगुंडाचा संतप्त जमावाच्या मारहाणीत मृत्यू, सात जणांना घेतलं ताब्यात
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाची हत्या करण्यात आली. जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी आकाश उईके याचा मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास आकाशने दुचाकी पाडत वाद घातला. आकाशने वाद घालत शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त लोकांनी आकाश उईकेला लाठ्याकाठ्या दगडांनी मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी आकाशचा मृत्यू झाला. आकाशवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करत सात जणांना ताब्यात घेतलं असून आरोपींची संख्या 11 पोहचली आहे. याप्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आंदोलनाचा आखाडा
इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्राध्यापकाच्या निलंबनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कुमार शुक्ल यांच्या वाहनाला अडवून घेराव घातला होता. याठिकाणी काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. त्यामुळं दंगल नियंत्रक पथक व पोलिसांची मोठी कुमक याठिकाणी दाखल करण्यात आली होती. गेल्या एक महिनाभरापासून विद्यापीठात विद्यार्थी विरुद्ध प्रशासन, विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी व कुलगुरू विरोधात सर्वच असा संघर्ष चालू आहे. त्यामुळं हिंदी विद्यापीठ हे आंदोलनांचा आखाडा बनला आहे.
लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
वर्ध्याच्या देवळी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या किशोर शेंडे तर कारंजा (घाडगे) इथला तलाठी प्रवीण भेले यांना प्रत्येकी तीन हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नायब तहसीलदाराने शेतकऱ्याच्या शेतीची आपसी वाटणी तर तलाठ्यांने शेताच्या पडताळणीचा अहवाल देण्यासाठी प्रत्येकी तीन हजाराची लाच मागितली होती. ही कारवाई देवळी व कारंजा इथं करण्यात आली. एकाच आठवड्यात महसुलच्या दोन कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.