वर्धा जिल्ह्यातील ही 10 पर्यटनाची ठिकाणे पाहिलीत का? एकदा नक्की द्या भेट
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
वर्धा जिल्ह्यातील 'ही' 10 पर्यटनस्थळे महत्त्वाची आहेत. पाहायला जाण्याआधी इथं जाणून घ्या थोडक्यात माहिती
वर्धा शहरासह जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. हा जिल्हा अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे. त्यामुळे जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी वर्ध्यात येत असतात. आपणही वर्धा येथे येण्याचा विचार करत असाल तर ही 10 ठिकाणे नक्की पाहा.
advertisement
advertisement
वर्धा शहरापासून 8-9 किलोमीटर धाम नदी काठावर पवनार हे गाव आहे. याठिकाणी आचार्य विनोबा भावेंनी 1934 साली परमधाम आश्रमाची स्थापना केली. आश्रमातील शेतीसाठी जमीन खोदत असताना विनोबा भावेंना सापडलेल्या दगडाच्या काही मूर्ती या ठिकाणी लावलेले आहेत. यातील भरत- राम भेटीचा प्रसंग दर्शवणारी एक मूर्ती मंदिरात विराजमान आहे.
advertisement
advertisement
विश्वशांती स्तूप हे वर्धा शहरातील पांढऱ्या रंगाचे एक मोठे स्तूप आहे. या स्तूपाच्या चार बाजूवर बुद्ध मूर्ती बसवलेल्या आहेत. स्तूपाजवळ एक मंदिर आहे जेथे सार्वत्रिक शांततेसाठी प्रार्थना केली जाते. हे स्तूप 1993 मध्ये खुले गेले असून महात्मा गांधींना प्रेरणास्थान मानणाऱ्या फुजि गुरुजींचे हे स्वप्न होते. जपानच्या आण्विक बॉम्बची प्रतिक्रिया म्हणून हा हा विश्वशांती स्तूप आहे.
advertisement
गीताई मंदिराला छत, भिंती नाहीत. गायीच्या आकारासारखे हे मंदिर आहे. विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केले. त्यांच्या भाषांतरीत गीताई पुस्तकातील 18 अध्याय या मंदिरात उभ्या दगडांवर कोरले आहेत. मंदिराच्या बाजूलाच शांती कुटी आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, जमनालाल बजाज यांच्या आठवणी प्रदर्शनीच्या स्वारुपात जपण्यात आल्या आहेत.
advertisement
मगन संग्रहालय हे ग्रामोद्योग आणि ग्रामविकासाच्या संकल्पनेवर आधारीत असलेले हे ऐतिहासिक असे संग्रहालय आहे. महात्मा गांधींनी 30 डिसेंबर 1938 रोजी मगन संग्रहालयाचे उद्घाटन केले. वर्धा शहराच्या मधोमध असलेल्या या संग्रहालयात अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. या संग्रहालयात गांधीजींशी संबंधित वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आलेल्या आहेत.
advertisement
advertisement
वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथील टेकडीवरील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हे मंदिर सर्वदूर परिचित आहे. या मंदिराचा फार प्राचीन इतिहास आहे. एवढेच नाही तर हे मंदिर वसिष्ठ ऋषींनी केवळ त्यांच्या पूजेकरिता निर्माण केल्याची आख्यायिका आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणून या केळझरच्या सिद्धिविनायकाची ओळख आहे.
advertisement
advertisement
वर्धा नागपूर मार्गावरील खडकी या ठिकाणी असलेल्या हनुमानाच्या पुरातन मंदिराला अंदाजे दीडशे वर्षांची परंपरा आहे. संकटमोचक हनुमानाच्या मूर्तीसह या ठिकाणी मंदिरात असलेलं चिंचेचे झाड देखील 150 वर्ष जुने असल्याचे भक्त सांगतात. या मंदिरासमोरील मार्गावरून प्रवास करणारे सर्व प्रवासी भक्त या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊनच पुढचा प्रवास करतात.