वर्ध्यातल्या हिंगणघाटची बाजार समिती विदर्भातील मोठी बाजार समिती आहे. त्यामुळे या बाजार समितीत लगतच्या अनेक जिल्ह्यातील शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या कापसाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. कापसाला चांगला दर मिळत असल्यानं कापसाची आवक देखील वाढली आहे.
advertisement
यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता
दरम्यान यंदा कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा कापसाच्या उत्पन्नात घट झालीये. कापसाची आवक कमी झाल्यास कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी पुरेसा पाऊसच पडला नाही. विदर्भात कापसाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला तर मराठवाड्यात पुरेसा पाऊस न पडल्यानं कापसाचं उत्पादनात घट झाली आहे.
