दरवर्षी पुण्यावरून येऊन घेतात वृद्धांची भेट
खुरगे कुटुंबातील काही सदस्य पुण्याला नोकरीनिमित्त राहतात. मात्र दरवर्षी दिवाळीनिमित्त सर्व कुटुंबीय वर्ध्यात एकत्रित येतात. आणि दिवाळीचा आनंद कुष्ठ रोगी वृद्धांसोबत द्विगुणित करतात. कुष्ठरोगी आश्रमातील वृद्ध अनेक सणांच्या आनंदापासून,आपल्या कुटुंबापासून वंचित असतात. मात्र समाजातील समाजभान ठेऊन सण साजरे करणारी मंडळी दिवाळीसरख्या सणानिमित्त वंचित व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच या आश्रमात राहणाऱ्या रुग्णांनाही आपुलकीचा सहवास लाभतो.
advertisement
एक नंबर पुणेकर, अनाथ मुलांना दुकानात नेलं अन् मनासारखे दिले कपडे
मायबाप आल्यासारखं वाटतं
दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येक घरातील सदस्य एकत्रित येऊन जल्लोष साजरा करतात. मात्र आश्रमातील काही मंडळी आपल्या कुटुंबापासूनही दूर असून त्यांची त्यांना भेट होत नाही. त्यामुळे समाजातील सहकार्याचं कर्तव्य निभावणारे काही व्यक्ती आश्रमात येऊन त्यांचा आनंद या वृद्धांसोबत सण साजरा करतात. त्यामुळे आम्हाला आमचे मायबाप आल्यासारखे वाटते आणि प्रचंड आनंद होतो अशा भावना वृद्धांनी व्यक्त केल्या.
5 हजार मजुरांची दिवाळी झाली गोड, पुण्यातील 'महा एनजीओ'चा अनोखा उपक्रम
2006 पासून आहे उपक्रम
सण 2006 पासून दत्तपुर येथील कुष्ठरोगी आश्रमातील वृद्धांसोबत खुरगे कुटुंब दिवाळी सण साजरा करत आहेत. शिवाय वर्षभरात कोणत्याही निमित्ताने अनेकदा या वृद्धांना भेटी देत असतात. आपण आपल्या कुटुंबीयांसोबत दरवर्षी दिवाळी सण साजरा करत असतो मात्र समाजातील काही असेही घटक असतात जे अनेक सणांच्या आनंदापासून वंचित असतात. त्यामुळे आपण त्यांनाही आपलं कुटुंब समजून आणि समाजात माणुसकी शिल्लक आहे त्याची जाणीव ठेवत अशा व्यक्तींसोबत दिवाळीचा आनंद साजरा करावा. आपलं कुटुंब हे आपल्यापुरतं न समजता आपण आपल्या समाजातील वंचित व्यक्तींना आपलं मानून त्यांनाही आपलं कुटुंब समजावं, अशा भावना खुरगे कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.





