एक नंबर पुणेकर, अनाथ मुलांना दुकानात नेलं अन् मनासारखे दिले कपडे
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यातील बाळासाहेब मालुसरे यांनी अनाथ मुलांची दिवाळी आनंददायी केली आहे.
पुणे, 13 नोव्हेंबर: दिवाळी म्हटलं की सगळीकडे खरेदीची लगबग असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नवीन कपडे खरेदी करतात. मात्र रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांना हा आनंद घेता येत नाही. हाच आनंद त्यांना मिळावा आणि त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने पुण्यातले मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी विशेष उपक्रम राबविला आहे. रस्त्यावरच्या मुलांना स्वतः दुकानात नेऊन कपडे खरेदी करून दिली. त्यामुळे अनाथ मुलांची दिवाळी आनंददायी झाली आहे.
किती वर्ष झालं राबवतात उपक्रम?
मालुसरे हे पाच वर्ष झाली हा उपक्रम राबवत आहेत. समाजातील काही वंचित मुलं आहेत, रस्त्यावर झोपतात, काम करतात आणि रस्त्यावर राहतात. आपण घरात मोठ्या प्रमाणात सण साजरे करत असतो. त्या मुलांना या सर्व गोष्टी काही भेटत नाहीत. त्यांचा सण हा आपण साजरा करत असतो. त्यांच्या साठी काम करतो ही गोष्ट समाधान देणारी आहे, असे मालुसरे सांगतात.
advertisement
कुठल्या वयोगटातील आहेत मुलं?
लक्ष्मी रोड वरील दुकानात नेऊन त्यांच्या आवडीचे कपडे व दिवाळीचा फराळ हा त्यांना वाटप केल जातो. 40 पेक्षा अधिक मुलांना हे दिलं जातं. मंडई, शिवाजीनगर, लक्ष्मी रोड या भागातील मुलांना हे वाटप होतं. 1 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी आणि त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील करणार आहे. एसएसपीएमएस या शाळेच्या लोकांचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. तर हा उपक्रम दिवाळी झाल्या नंतर सुरु करणार आहे, असंही मालुसरे यांनी सांगितलं.
advertisement
उपक्रमाचा उद्देश काय?
view commentsसमाजातील लोकांचं आपण काही तरी देणं लागतो. या भावनेतून हा उपक्रम सुरु केला आहे. आपण जसं आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या लोकांना मदत करतो. त्याच पद्धतीने यांना देखील मदत करून ते या गोष्टीपासून वंचित राहू नयेत, हा या पाठीमागचा उद्देश आहे, असं मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2023 12:04 PM IST

