advertisement

Currency : 100 आणि 500 रुपयांच्या नोटांवरील या छोट्या रेषांचा अर्थ माहित आहे का? 90% लोक हे माहितच नाही

Last Updated:
भारतीय चलनातील प्रत्येक नोटेवर काही असे खास सुप्त संकेत किंवा खुणा असतात, ज्या मागे एक महत्त्वाचा उद्देश असतो. आज आपण अशाच एका चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्ही दररोज पाहता पण कदाचित तुम्हाला त्याचा अर्थ माहीत नसेल.
1/6
आजच्या डिजिटल युगात आपण फोनवरून स्कॅन करून पैसे देण्याला प्राधान्य देतो. तरीही खिशात काही रोकड असणं ही आपली गरज आहे. भाजीवाला असो किंवा रिक्षावाला, आजही 10, 200, 100 आणि 500 च्या नोटा आपल्या हाताखालून दररोज जातात. आपण त्या नोटा पाहतो, खर्च करतो, पण कधी त्यावरील बारीक डिझाइन्सचा विचार केला आहे का?

2/6
एखादी दुर्मिळ वस्तू दिसली की आपण ती कुतूहलाने न्याहाळतो, पण दररोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. भारतीय चलनातील प्रत्येक नोटेवर काही असे खास सुप्त संकेत किंवा खुणा असतात, ज्या मागे एक महत्त्वाचा उद्देश असतो. आज आपण अशाच एका चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्ही दररोज पाहता पण कदाचित तुम्हाला त्याचा अर्थ माहीत नसेल.

3/6
नोटेच्या कडेला असलेल्या 'त्या' रेषा काय आहेत?जर तुम्ही 100, 200 किंवा 500 रुपयांची नोट हातात घेतली आणि तिच्या दोन्ही कडांना (Edges) निरखून पाहिलं, तर तुम्हाला तिथे काही तिरप्या रेषा दिसतील. विशेष म्हणजे, या रेषांची संख्या प्रत्येक नोटेवर वेगवेगळी असते. तुम्ही कधी विचार केलाय का की या रेषा कशासाठी असतात? केवळ शोभेसाठी? तर तसे अजिबात नाही.

4/6
प्रत्येक नोटेचं वेगळं गणितभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनी नोटांची रचना करताना प्रत्येक मुल्यासाठी (Denomination) वेगळी ओळख ठेवली आहे. या रेषांच्या संख्येवरून तुम्ही नोट कितीची आहे हे ओळखू शकता:
100 रुपयांची नोट: या नोटेच्या दोन्ही कडांवर तुम्हाला प्रत्येकी चार तिरप्या रेषा दिसतील.
200 रुपयांची नोट: या नोटेवर चार रेषा आहेत, पण त्यामध्ये दोन लहान वर्तुळे (ठिपके) देखील बनवलेले आहेत.
5000 रुपयांची नोट: या नोटेच्या दोन्ही बाजूंना पाच तिरप्या रेषा असतात.
2000 रुपयांची नोट: (आता चलनात कमी असली तरी) या नोटेवर दोन्ही बाजूला सात रेषा होत्या.
प्रत्येक नोटेचं वेगळं गणितभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनी नोटांची रचना करताना प्रत्येक मुल्यासाठी (Denomination) वेगळी ओळख ठेवली आहे. या रेषांच्या संख्येवरून तुम्ही नोट कितीची आहे हे ओळखू शकता:100 रुपयांची नोट: या नोटेच्या दोन्ही कडांवर तुम्हाला प्रत्येकी चार तिरप्या रेषा दिसतील.200 रुपयांची नोट: या नोटेवर चार रेषा आहेत, पण त्यामध्ये दोन लहान वर्तुळे (ठिपके) देखील बनवलेले आहेत.5000 रुपयांची नोट: या नोटेच्या दोन्ही बाजूंना पाच तिरप्या रेषा असतात.2000 रुपयांची नोट: (आता चलनात कमी असली तरी) या नोटेवर दोन्ही बाजूला सात रेषा होत्या.
advertisement
5/6
या रेषांचा खरा उद्देश: 'ब्लीड मार्क्स' (Bleed Marks)विज्ञानाच्या आणि सुरक्षेच्या भाषेत या विशेष रेषांना 'ब्लीड मार्क्स' म्हणतात. हे चिन्ह प्रामुख्याने दृष्टिबाधित (Visually Impaired) लोकांसाठी बनवण्यात आले आहेत.
ज्या व्यक्तींना डोळ्यांनी पाहता येत नाही, ते नोटेच्या कडांना स्पर्श करून किंवा या रेषांवरून हात फिरवून ती नोट किती रुपयांची आहे हे सहज ओळखू शकतात. या एका छोट्याशा खुणेमुळे कोणावरही अवलंबून न राहता दृष्टिबाधित व्यक्ती स्वावलंबनाने व्यवहार करू शकतात.
या रेषांचा खरा उद्देश: 'ब्लीड मार्क्स' (Bleed Marks)विज्ञानाच्या आणि सुरक्षेच्या भाषेत या विशेष रेषांना 'ब्लीड मार्क्स' म्हणतात. हे चिन्ह प्रामुख्याने दृष्टिबाधित (Visually Impaired) लोकांसाठी बनवण्यात आले आहेत.ज्या व्यक्तींना डोळ्यांनी पाहता येत नाही, ते नोटेच्या कडांना स्पर्श करून किंवा या रेषांवरून हात फिरवून ती नोट किती रुपयांची आहे हे सहज ओळखू शकतात. या एका छोट्याशा खुणेमुळे कोणावरही अवलंबून न राहता दृष्टिबाधित व्यक्ती स्वावलंबनाने व्यवहार करू शकतात.
advertisement
6/6
ज्या नोटांना आपण दररोज स्पर्श करतो, त्या केवळ कागदाचे तुकडे नसून भारतीय चलन प्रणालीची एक अत्यंत प्रगत आणि संवेदनशील रचना आहे. या 'ब्लीड मार्क्स' मुळे समाजात सर्व स्तरातील लोकांना आर्थिक व्यवहार करणे सोपे जाते. आपल्यासाठी कदाचित त्या केवळ साध्या रेषा असतील, पण दृष्टिबाधित बांधवांसाठी तो एक मोठा आधार आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement