advertisement

'...अशी एक भयान शांतता जाणवते' अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट, मजकूर डोळ्यात पाणी आणणारा

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून तिथली झाडंही स्तब्ध आहेत. जे काही घडलं त्याचे साक्षीदार बनून जणू मूकपणे अश्रूच ढाळतात असं वाटतं.

News18
News18
बारामती : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज ८ दिवस उलटले आहे. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानमध्ये आजही कार्यकर्ते आणि बारामतीकडून दादांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. एरवी विद्या प्रतिष्ठानमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आनंदाने जाणं व्हायचं पण आता मात्र तिथं जाताना अंतःकरण जड होतं. पाय उचलतानाही जड जातो. संस्थेच्या आवारात शिरताच जणू काय खायला उठतेय की काय अशी एक भयान शांतता जाणवते.' असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काका अजितदादांसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आज बारामतीत सहयोग या सोसायटी निवासस्थानी शरद पवार यांनी भेट देत दिवंगत अजितदादांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले पूजन केलं आणि राज्यभरातून अजितदादा प्रेमी कार्यकर्त्यांना त्यांनी सांत्वन पर उपस्थित राहून भेट दिली. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थितीत होतं. यावेळी रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
"बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मा. अजितदादांचा अंत्यविधी केला त्या चौथऱ्यावर जाऊन आज पुन्हा एकदा दादांना श्रद्धांजली अर्पण केली. एरवी विद्या प्रतिष्ठानमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आनंदाने जाणं व्हायचं पण आता मात्र तिथं जाताना अंतःकरण जड होतं.. पाय उचलतानाही जड जातो. संस्थेच्या आवारात शिरताच जणू काय खायला उठतेय की काय अशी एक भयान शांतता जाणवते.. गेल्या काही दिवसांपासून तिथली झाडंही स्तब्ध आहेत. जे काही घडलं त्याचे साक्षीदार बनून जणू मूकपणे अश्रूच ढाळतात असं वाटतं. तिथल्या झाडांमधून एरवी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाटही जाणवेल इतका शांत झाला आहे, अशी भावना रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली.
advertisement
advertisement
तसंच, "चौथऱ्याची एकेक पायरी चढताना असंख्य आठवणी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा झरझर बाहेर पडत होत्या. दादांना जाऊन आठ दिवस झाले तरी इथं येणाऱ्या लोकांची रिघ कमी झालेली नाही. दररोजच अगदी रात्री उशिरापर्यंत लोक येतात, फुलं वाहतात आणि अश्रू गाळतात. तिथं असलेल्या फुलांची भलीमोठी रास लोकांमध्ये असलेली दादांची श्रीमंतीच दाखवत होती यावेळी नाशिक भागातील काही चिमुकली मुलं-मुलीही दादांच्या अंत्यदर्शनाला आले होते. आम्ही सर्वांनीच सामुहिकपणे श्रद्धांजली अर्पण केली आणि लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो' असं म्हणत रोहित पवार यांनी   प्रार्थना केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'...अशी एक भयान शांतता जाणवते' अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट, मजकूर डोळ्यात पाणी आणणारा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement