27 किमी मायलेज, लेकरांसाठी मस्त असं सनरुफ, किंमतही कारपेक्षा कमी, भारतातील 5 टॉप SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
आता जवळपास प्रत्येक कार उत्पादक कंपन्या या दमदार फिचर्स एसयूव्हीमध्ये देत आहे. त्यातच सनरुफ हा मध्यमवर्गीयांचा सगळ्यात फेव्हरेट विषय बनला आहे.
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्याच एसयूव्हीच्या किंमतीही बजेटमध्ये आल्या आहेत. त्यामुळे चांगल्या फिचर्सची एसयूव्ही घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीय आता एसयूव्ही खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे. आता जवळपास प्रत्येक कार उत्पादक कंपन्या या दमदार फिचर्स एसयूव्हीमध्ये देत आहे. त्यातच सनरुफ हा मध्यमवर्गीयांचा सगळ्यात फेव्हरेट विषय बनला आहे. सनरुफ आणि सेफ्टी फिचर्स असलेल्या SUV च्या विक्रीचा ट्रेंड सध्या चांगलाच सुरू आहे. यामध्ये ५ अशा एसयूव्ही आहे ज्या तुमच्या बजेटमध्ये आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Tata Punch - टाटा मोटर्सची टँकसारखी ही मिड साईज अर्थात मायक्रो एसयुव्ही मध्यमवर्गीयांची फेव्हरेट आहे. भारतात सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. Tata Punch मध्ये सनरूफ हे Pure+ S आणि Adventure S व्हेरिएंटमध्ये दिलं आहे. Tata Punch च्या सनरुफ मॉडेलची किंमत ७.३५ लाखांपासून सुरू होते. Tata Punch मध्ये १.२-लीटर Revotron पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ८८ PS पॉवर आणि ११५ Nm टॉर्क जनरेट करतो.
advertisement
Tata Punch CNG पर्याय सुद्धा आहे, जे १८-२० kmpl मायलेज दिलं. Tata Punch मध्ये इलेक्ट्रिक सिंगल-पेन सनरूफ व्हॉइस असिस्टेड आहे. ५-स्टार GNCAP सेफ्टी, ७-इंच डिजिटल डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, ३६० डिग्री कॅमेरा, हिल होल्ड आणि १८७ mm ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे. Tata Punch मध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग दिल्या आहे.
advertisement
Tata Altroz : टाटा मोटर्सची Tata Altroz ही एक दमदार आणि पॉवरफुल अशी सेफ हॅचबॅक कार आहे. Tata Altroz मध्ये सनरूफ Pure S आणि XM S व्हेरिएंटपासून मिळतो. Tata Altroz ची एक्स शोरूम किंमत ७.३६ लाखांपासून सुरू होते. Tata Altroz मध्ये १.२-लीटर पेट्रोल, CNG आणि डिझेल इंजिनचा पर्याय दिला आहे. Tata Altroz ही १९-२३ kmpl मायलेज देते. Tata Altroz मध्ये इलेक्ट्रिक सिंगल-पेन सनरूफ व्हॉइस असिस्टेड आहे. शिवाय ५-स्टार सेफ्टी, १०.२५-इंच इन्फोटेनमेंट, वायरलेस चार्जिंग आणि क्रूझ कंट्रोलसारखी फीचर्स आहेत.
advertisement
Kia Sonet - दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या Kia मोटर्सची Kia Sonet एक प्रीमियम कॉम्पॅक्ट SUV आहे. Kia Sonet मध्ये सनरूफ HTE(O) आणि HTK व्हेरिएंटमध्ये मिळतो. Kia Sonet ची किंमत ७.९९ लाखाांपासून सुरू होते. इंजिन १.२-लीटर NA पेट्रोल, १.०-लीटर टर्बो आणि १.५-लीटर डिझेल दिलं आहे. Kia Sonet ही १८-२४ kmpl इतकं मायलेज देते, इलेक्ट्रिक सिंगल-पेन सनरूफसोबत LED लाइट्स, १०.२५-इंच टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, स्टँडर्ड ६ एअरबॅग आणि Bose ऑडिओ मिळतो.
advertisement
advertisement








