गुजरातचे व्यापारी कमलेश शहा यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेसिंग सोलंके हा गत काही दिवसांपासून त्यांच्या नागपूर कार्यालयात कामास आहे. नागपूर कार्यालयाचे नितीन जोशी यांच्याकडून 4 कोटी 52 लाख रुपये घेवून सोलंके हा कारने नागपुरातून हैद्राबादकडे निघाला होता. वाटेत समुद्रपूर तालुक्यातील पोहणा येथे एक कार सायरन वाजवीत त्यांच्या मागे आली. त्यातून चार लोक उतरले. या चौघांनी प्लास्टिकच्या काठ्यांनी दरडावून सोळंके यास गाडीतून खाली खेचले. मारहाण करीत पैश्याबाबत विचारणा केली.
advertisement
डोक्यावर बंदूक ताणत धमकी दिल्याने सोलंकेने रक्कम दिली. त्यानंतर चौघेही कारने पसार झाले. सोलंकेने लगेच वडनेर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथक सज्ज केले. या दहा पथकांनी लगतच्या जिल्ह्यात शोध सुरू केला. तांत्रिक तपास कामी आला. अवघ्या पाच तासात तीन आरोपी गळास लागले. वर्धा पोलिसांनी अल्प वेळेत वेगवान कारवाई केल्याने सर्वजण कौतुक करत आहेत. पोलिसांनी तीन कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही जप्त केलं आहे. पोलिसांनी तीन कोटी 46 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईत 100 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या 15 पथकांनी या प्रकरणाचा छडा लावला.
वाचा - ते दोघेही हॉटेलमध्ये थांबले होते, सकाळी एकत्र संपवलं आयुष्य, संभाजीनगरमधील घटना
पोलिसांना 50 हजारांचे बक्षिस
वर्धा पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलीस विभागाची मान अभिमानाने उंचावली आहे. यासाठी तपास चमूला 50 हजारांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. आरोपींना नागपूरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याकरिता नागपूर, अमरावती येथील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचं सहकार्य मिळालं. नागपूरहून हैद्राबादकडे जात असताना पोहणा शिवारात ही घटना घडली होती.
