ते दोघेही हॉटेलमध्ये थांबले होते, सकाळी एकत्र संपवलं आयुष्य, संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

Last Updated:

पोलिसांनी रुमची पूर्ण झडती घेतली मात्र कुठेही सुसाईड नोटही अजून सापडली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

( प्रातिनिधिक फोटो)
( प्रातिनिधिक फोटो)
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर : देशभरात एकीकडे दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  आयुष्यभर एकमेकांची साथ निभावण्याचं प्रत्येक प्रेमी युगुलाचं स्वप्न असतं. मात्र, शहरातील एका नामांकित हॉटेल पंचवटीमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुरेश राऊत आणि दिपाली अशोक मरकड असं प्रेमीयुगूलाची नावं आहेत. शहरातील पंचवटी हॉटेलमध्ये दोघे थांबले होते. रूम नंबर 305 मध्ये दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघेही शहरानजीक असलेल्या बिडकीन इथले रहिवासी होते.
या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अजूनही कोणतंही कारण समजू शकलं नाही. पोलिसांनी रुमची पूर्ण झडती घेतली मात्र कुठेही सुसाईड नोटही अजून सापडली नाही. पोलीस मित्र आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत. प्रेमी युगुलाने असं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण शोधत आहेत. आत्महत्या की घातपात आहे याचा वेदांतनगर पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
ते दोघेही हॉटेलमध्ये थांबले होते, सकाळी एकत्र संपवलं आयुष्य, संभाजीनगरमधील खळबळजनक घटना
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement