वाहतूक कधी बंद राहणार?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री १० वाजेपासून ते ८ मार्च रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत हा महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत रेल्वे फाटकावर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचे आदेश दिले आहेत. मालेगावकडून जाणारी वाहने ही वाहने वाशिम - मंगरूळपीर - कारंजा या मार्गाने पुढे जातील. कारंजा बायपासने शेलू बाजारकडे जाणारी वाहने ही वाहतूक आता समृद्धी महामार्गावरून वळवण्यात आली आहे.
advertisement
मंगरूळपीरकडून शेलू बाजारमार्गे मालेगावकडे जाणारी वाहने या वाहनांना देखील समृद्धी महामार्गाचा वापर करावा लागणार आहे. रेल्वेच्या कामामुळे होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वरील पर्यायी मार्गांची नीट माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
