TRENDING:

राज्यात याठिकाणी पडणार गुलाबी थंडी, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?, VIDEO

Last Updated:

maharashtra weather update - मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सकाळच्या वेळी धुकेही पाहायला मिळत आहे. तसेच नाशिकमधील तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 24 तासात तापमान व हवामानाची स्थिती कशी असेल, हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - राज्यातून पावसाने आता काढता पाय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये थंडी जाणवायला देखील सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सकाळच्या वेळी धुकेही पाहायला मिळत आहे. तसेच नाशिकमधील तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 24 तासात तापमान व हवामानाची स्थिती कशी असेल, हे जाणून घेऊयात.

advertisement

मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. कोकण विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल.

पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ आकाश असेल. पुण्यातील किमान तापमानामध्ये घट झाल्याचही पाहायला मिळेल. त्यामुळे पुणेकरांना गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहील.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवेल.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये धोक्यासह ढगाळ आकाश राहील. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असेल. विदर्भामध्येही कोरडे हवामान पाहायला मिळेल.

advertisement

मॉलमध्ये काम करायची बायको, मुलीसह 5 लाख रुपये घेऊन फरार, नवरा म्हणाला...

उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता, नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असेल. पुणे आणि नाशिक या दोन शहरांमधील किमान तापमानात घट नोंदवली जात असून यामुळे या दोन शहरातील नागरिकांना थंडी जाणवण्यास सुरुवात होणार आहे.

advertisement

एकंदरीत राज्यातून पावसाने काढता पाय घेतला असून पुढील पाच दिवस तरी राज्यात पावसाची कुठलीही शक्यता नाही. त्याचबरोबर संपूर्ण राज्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडा हवामान पाहायला मिळणार असून हळूहळू थंडीचा जोर देखील वाढण्यास सुरुवात होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात याठिकाणी पडणार गुलाबी थंडी, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल