TRENDING:

Supriya Sule: 'मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, मग...' सुप्रिया सुळे आता थेटच बोलल्या

Last Updated:

नॉनव्हेज मी  खाते फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: "मी रामकृष्ण हरीवाली आहे फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.  माझे आई वडील, सासू सासरे नवरा खातो आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? असं परखड सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.
News18
News18
advertisement

नाशिक जिल्ह्यातील खेडगाव इथं महात्मा जोतिबा फुले पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला. यावेळी  सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी मटण खाण्याच्या वादावर भाष्य केलं.

"मी रामकृष्ण हरीवाली आहे फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे'  असा सवालच सुप्रिया सुळेंनी विचारला.

advertisement

तसंत, माझे आई-वडील, सासू सासरे, माझा नवरा खातो आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय?  नॉनव्हेज मी  खाते फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून दिलं असे समजा, असंही सुळेंनी ठणकावून सांगितलं.

advertisement

झिरवळ यांना टोला

तसंच 'प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही, आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही. कोर्टात लढाई सुरू आहे माझ्या वडीलांप्रमाणे, माझ्या आईचेही गुण माझ्या अंगात त्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी मी सत्याची बाजू कधी सोडणार नाही. विरोधात बसू पण चुकीची गोष्ट करणार नाही अन्यायाविरोधात झुकणार नाही. माझी ताकद माझी इमानदारी आहे. मला मेट्रो आणि ब्रीजमध्ये प्रेम नाही. माझी विकासाची आयडिया आणि सरकारची विकासाची आयडिया यात फरक आहे.  इथे बसलेल्या महिलेची काचेही बांगडी सोन्याची होईल त्याला विकास म्हणतात.  शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल तेव्हा विकास म्हणतात. कांद्याला भाव मिळावा म्हणून शरद पवारांनी आवाज उचलला. भाजपाने 10 वर्ष सलग पवार साहेबांच्या विरोध केला तरी शरद पवार थांबले नाहीत. कांद्याचा भाव पडला की तुमचे खासदार भगरे पियूष गोयल यांना भेटतात. अतिशय सुसंस्कृत खासदार तुम्ही निवडून दिला आहे.  आमचे वैचारिक मतभेद सगळ्यांशी मात्र वैयक्तिक कुणाशी नाही. झिरवाळ यांची भाजपाशी नसेल एवढी माझ्याशी कौटुंबिक संबंध आहेत. पण उंबरठ्याच्या आत कौटुंबिक संबंध, बाहेर मात्र आपली तलवार रेडी आहे.  घरी या स्वागत करू, सगळी नाती जपू, महिलांचा तो गुण आहे पण सहन करायची मर्यादा आहे, असं म्हणत झिरवळ यांना इशाराही सुळे यांनी दिला.

advertisement

ट्रम्प  यांनी घेतील त्या निर्णयाने तुमच्या माझ्या आयुष्यात फरक पडणार आहे. 70 वर्षात अमेरिकेला शेतीच्या दारात पाऊल ठेवू दिलं नाही.  ट्रम्प रोज म्हणतात आम्ही युद्ध थांबवलं. सगळ पोटातलं ओठावर आणायचं नसतं. सत्ता असेल त्यांची पण हम भी किसिसे कम नहीं. इमानदार जास्त आणि निष्ठेने राहतो. सगळे खासदार उतरलो होतो रस्त्यावर आम्ही नाही घाबरत कोणाला. काय करतील जेलमध्ये टाकतील, फासावर देतील, पण विचार मरणार नाही.   फुले दांपत्याने शिकवलं नसत तर सुप्रिया सुळे शिकली असते का?  50 वर्षांपूर्वी ज्या माणसाने एका मुलीवर स्वतःचं ऑपरेशन केलं, माझ्या आईचे नाही केले त्याला पुरोगामी विचार करतात म्हणतात की नाही. झिरवाळ साहेब तुम्ही आहात तिथे लढा, असा सल्लाही सुळेंनी दिला.

advertisement

'मुख्यमंत्री फडणवीस भेटीला वेळच देत नाही'

आता आपण कशावर चर्चा करतो कबुतर,कुत्रे. कर्जमाफीवर उत्तर मिळेल का मला,  राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते सरसकट कर्जमाफी देतो. मी म्हणाले होते खोटे बोलले होणार नाही. फक्त राष्ट्रवादी शदर पवार गटाचे खासदार अमित शहा यांच्याकडे गेले. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून गृहमंत्री नाही सहकार मंत्री आहेत म्हणून. अधिकार त्यांना आहे म्हणून गेलो मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्यामुळे मी मागणच बंद केलं.  दहा वेळा आपण वेळ मागतो पण वेळ देत नाही याचा अर्थ काय, त्यांना वेळ द्यायचा नाही.  मी ठरवलं आहे, इथे काम करत नाही ना, माझी कामं दिल्लीत होतात. मी जाहीर पणे अमित शहा यांचे आभार मानते. अमित शहा यांनी वेळ दिली, असं म्हणत सुळेंनी फडणवीसांना टोला लगावला.

'लाडकी बहीण योजनेची संपूर्ण चौकशी करणार'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

मला लाडक्या बहिणीची चिंता आहे. 25 लाख लाडक्या बहिणींची नावं सरकारने कमी केले. माझी सगळ्यांना विनंती आहे. झिरवाळ साहेब आपण ताकदीने याचा विरोध करायला हवा. स्कीम केली तेव्हाच म्हणाले होते राज्य आर्थिक संकटात जाईल. लाडकी बहीण योजनेची संपूर्ण चौकशी सुप्रिया सुळे करणार आहे.  4800 कोटींचा हा मोठा घोटाळा आहे.  हजारो पुरुषांनी एवढा फार्म कसा भरला आर आर आबांनंतर पोलीस भरती झालीच नाही. मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का? असा सवाल करत लाडकी बहिण योजनेच्या चौकशीसाठी लढणार असं सुळेंनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule: 'मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, मग...' सुप्रिया सुळे आता थेटच बोलल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल