मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांसह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
advertisement
पालघरच्या जव्हारमधील वाळवंडा या अती दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे . आदिवासी समाजातील तारपा हे पारंपरिक वाद्य त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवलं. मागील 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत . आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं असलं तरी देखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय. विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कोण आहेत वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा?
घरातच तारपा वादन वर्षानुवर्षे चालत असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच तारपा वाजविण्याची आवड होती. लहानपणी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते जंगलात गुरे वळण्यासाठी घेऊन जात. त्यावेळी ते आपल्या सोबत तारपा वाद्य घेऊन जात असत. गुरे चरत असताना ते तारपा वादनाचा सराव करायचे . त्यांच्या घराण्यात साधारण दीडशे वर्षांपासून तारपावादनाची परंपरा आहे. त्यांचे आजोबा नवसू धाकल्या धिंडा तारपा वादन करीत असत. त्यानंतर त्यांचे वडील लाडक्या धाकल्या धिंडा तारपा वाद्य वाजवत.
तारपा हेच वाद्य आपलं दैवत: भिकल्या लाडक्या धिंडा
शिक्षण नसलेल्या धिंडा यांना वयाच्या अवघ्या बारा वर्षांपासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली. आज 92 वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्यात तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे. आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं असलं तरी देखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय. तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असा आवाहन देखील यावेळी धिंडा यांच्याकडून करण्यात आलं.
हे ही वाचा :
