TRENDING:

Satara gazetteer: पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदीसाठी सातारा गॅझेटियर इतकं महत्त्वाचं का? ज्यासाठी घेतलाय महिन्याचा वेळ

Last Updated:

सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला सातारा गॅझेटचा आरक्षणासाठी मोठा आधार मिळू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा निर्णय दोन महिन्यात घेतला जाणार आहे. तर एका महिन्यात सातारा गॅझेट लागू केलं जाणार आहे. ब्रिटीश काळात झालेल्या जनगणनेची नोंद सातारा गॅझेटमध्ये करण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदीसाठी सरकार सातारा गॅझेटियरचाही जीआर काढणार आहे. औंध आणि सातारा गॅझेटियरमधील किचकट गोष्टींचा अभ्यास करून त्याचा जीआर काढण्यात येणार आहे.
News18
News18
advertisement

मराठा हा मुख्यत्वे शेती करणारा आणि कुणबीशी नाते सांगणारा आहे. 'कुणबी आणि मराठा या जाती वेगळ्या मानल्या जात नाहीत, असं गॅझेटमध्ये नमूद करण्यात आलंय. 'कुणबी आणि मराठा परस्परांमध्ये विवाह, सामाजिक संबंध आहेत' 'मराठा समाजाने आपली ओळख ऐतिहासिकरीत्या कुणबी म्हणून दाखवता येते' तसंच 'शेतकरी म्हणून दोन्ही समाजांची जीवनशैली सारखी आहे', असं निरीक्षणही नोंदवण्यात आलंय. 'मराठा, कुणबी एकच मूळ समाज' आहे. आणि 'मराठा, कुणबीमध्ये खूपच कमी वेगळेपणा असल्याचं गॅझेटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला सातारा गॅझेटचा आरक्षणासाठी मोठा आधार मिळू शकतो.

advertisement

सातारा गॅझेट म्हणजे काय?

  • सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याचा अधिकृत शासकीय राजपत्र आहे.
  • यामध्ये जिल्ह्यातील शासकीय योजना, जमिनीचे व्यवहार, निवडणूक सूचना आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध बाबींची नोंद असते.
  • काही मराठा कुटुंबांची ओळख ‘कुणबी’ म्हणून या गॅझेटमध्ये नोंदवलेली असल्याचा दावा आहे.
  • जर हे पुरावे ग्राह्य धरले गेले, तर त्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाऊ शकते आणि त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते.
  • advertisement

मराठवाड्यात कुणब्यांनी मोठ्या प्रमाणात मराठा जातीची नोंद केली होती. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांची कुणबी नोंद सापडण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. मात्र निझामाच्या राजवटीत हैदराबाद संस्थानात मराठ्यांची कुणबी अशी नोंद करण्यात आली होती. त्यामुळे हैदराबाद गॅझेटसाठी जरांगे पाटील आग्रही होते. हैदराबाद गॅझेटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

advertisement

हैदराबाद गॅझेट म्हणजे हैदराबाद संस्थानाच्या काळातील सरकारी राजपत्र. गॅझेटमध्ये मराठा समाजाची 'कुणबी मराठा' अशी नोंद करण्यात आलीय. हैदराबाद संस्थानातील 1881 च्या जनगणनेत 'कुणबी मराठा' नोंद आढळते. शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा, असा गॅझेटमध्ये उल्लेख करण्यात आलाय. हैदराबाद सरकारनं 1902 ते 1948 दरम्यान समाजघटकांबाबत अभ्यास केला. अभ्यास करून काही जातींना शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागास घोषित करण्यात आलं. गॅझेटमध्ये मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागास गटात दाखवण्यात आलं. घोषणांची नोंद अधिकृत अशा हैदराबाद गॅझेट्स मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती

advertisement

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी कुणबी ओळख आवश्यक आहे. आणि त्यासाठी सातारा आणि हैदराबाद गॅझेट महत्त्वाचं ठरणार आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगण्यात आलंय. तर सातारा गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा या जाती वेगळ्या नाहीत, असं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara gazetteer: पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदीसाठी सातारा गॅझेटियर इतकं महत्त्वाचं का? ज्यासाठी घेतलाय महिन्याचा वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल