मनासारखा हुंडा, मानपान न दिल्याच्या कारणावरुन सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यात येत होता
मोहोळ तालुक्यातील सासरच्या मंडळानी दिलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वाती जयंत थोरात असे मृत 33 वर्षीय महिलेचे नाव आहे. स्वाती हिचा मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत 2015 साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतरपासून सासरची मंडळी हे वारंवार तिला त्रास देतं होते. काही दिवसापासून तीच्या चारित्र्यवर देखील संशय घेण्यात येतं होता.
advertisement
5 लाखासाठी सासरी छळ
तसेच माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये असा तगदा देखील लावण्यात आल्याचा आरोप मृत स्वातीच्या कुटुंबियांनी केला. याचं त्रासाला कंटाळून स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वातीचे पती जयंत थोरात, सासरे चंद्रकांत थोरात, सासू सिंधुमती थोरात, नणंद आश्विनी पाटील या सर्वांच्या विरोधात मोहोळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलाय. पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत. मात्र, वैष्णवी हगवणे आणि दीपा यांच्यासारख्या नववधुंनी हुंड्यापायी आपले जीवन संपवल्याने समाज पुन्हा जुन्याच रुढी परंपरेत जखडला जातोय, हेच दिसून येते.
पुण्यात विवाहितेचा छळ
लग्नाला तब्बल 17 वर्षे उलटूनही एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सुरू ठेवल्याचे उघड झाले आहे. या हुंड्याच्या छळाला कंटाळून पीडित विवाहितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिडीतेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी घटनेनंतर पसार झाले असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न 2008 मध्ये विजय तुपे यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळींनी 'हुंडा कमी दिला' या क्षुल्लक कारणावरून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
