याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आरे ते वरळी मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत धावते. मात्र, गणेशोत्सवादरम्यान ही वेळ मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सवात मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 पर्यंत धावेल. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौकादरम्यान मेट्रो सुरू आहे. दररोज सुमारे 60 हजार प्रवासी मेट्रो-3 कॉरिडॉरचा वापर करत आहेत.
advertisement
वरळी आणि आरे यांमधील मेट्रो 'मुंबई मेट्रो लाइन 3'चा भाग आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑक्टोबर 2024 मध्ये झालं आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मे 2025 मध्ये झालं. या प्रकल्पामुळे आरे ते वरळी प्रवास सुमारे 30 मिनिटांत पूर्ण करता येतो. प्रवासाचा वेळ वाचत असल्याने हजारो प्रवासी या मेट्रो लाईनचा वापर करतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
