Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईतून तब्बल 306 स्पेशल ट्रेन, कसं असणार नियोजन?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Central Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे सज्ज आहे. या काळात 306 विशेष गाड्या चालवण्यात येणार असून तिकीट खिडक्या देखील वाढवण्यात आल्या आहेत.
मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने व्यापक तयारी केली आहे. यंदा गणेशभक्तांच्या सोयीसाठी 306 गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर अशा विविध दिशांना धावणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईत लालबागचा राजा, चिचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर, कडर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे आणि पनवेल या स्थानकांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना सहजपणे तिकीट मिळावे यासाठी 30 मोबाइल-यूटीएस यंत्रणा वितरित करण्यात आल्या असून चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर 27 ऑगस्टपासून प्रत्येकी दोन अतिरिक्त यूटीएस खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत.
advertisement
प्रवासी व्यवस्थापनासाठी 180 तिकीट तपासणी कर्मचारी विविध स्थानकांवर तैनात करण्यात आले असून गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल या प्रमुख स्थानकांवर 30 ऑगस्टपर्यंत व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
advertisement
गणेशोत्सव विशेष गाड्यांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रमुख स्थानकांवर सूचना फलक, नियमित उद्घोषणा आणि चौकशी केंद्रांवर माहिती देण्याची सोय करण्यात आली आहे. या गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेच्या IRCTC संकेतस्थळावर, एनटीईएस अॅप, रेलवन अॅप आणि पीआरएस केंद्रांवर उपलब्ध आहे.
मध्य रेल्वेच्या या व्यापक उपाययोजनांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुगम, सुसूत्र व सुरक्षित होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 10:53 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईतून तब्बल 306 स्पेशल ट्रेन, कसं असणार नियोजन?











