Ganeshotsav 2025: बाप्पाच्या आगमनाला रेल्वेचं गिफ्ट, मुंबई-सावंतवाडी मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ganeshotsav 2025: कोकणवासीय गणेशभक्तांसाठी बाप्पाच्या आगमनाआधीच एक खास गिफ्ट दिलंय. मुंबई ते सावंतवाडी विशेष रेल्वे धावणार आहे.
मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने खास निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोड या मार्गावर दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणपती विशेष गाडी एलटीटी येथून 26 आणि 27 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजता सावंतवाडी रोडकडे रवाना होईल. याचप्रमाणे सावंतवाडीहून परतीची गाडी 01110 क्रमांकाने 26 आणि 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.45 वाजता सुटेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
advertisement
कशी आहे गाडी?
गाडीमध्ये एकूण 22 एलएचबी कोच असणार असून, त्यामध्ये 1 प्रथम श्रेणी, 1 द्वितीय श्रेणी, 5 तृतीय श्रेणी, 8 शयनयान आणि 4 सामान्य डबे असतील. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांना बसण्याची सोय होणार आहे.
advertisement
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे अनेक प्रवाशांना आरक्षण मिळण्यात अडचणी येत असतात. या विशेष गाड्यांमुळे त्यांना मोठा फायदा होईल. तसेच, मध्य रेल्वेने महाराष्ट्र व कोकण विभागातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन 306 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मडगाव, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या स्थानकांवरून या गाड्या धावणार आहेत.
advertisement
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायी होणार आहे. तर नागपूरच्या दिशेनेही 01101 क्रमांकाची सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सोडण्यात येणार असून तिचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: बाप्पाच्या आगमनाला रेल्वेचं गिफ्ट, मुंबई-सावंतवाडी मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक







