मंदिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
यावर्षी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे.
- एआय (AI) तंत्रज्ञान: गर्दीचे नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जाणार आहे.
- सीसीटीव्ही कॅमेरे: मंदिर परिसरात १२० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
- इतर साधने : ५ डीएफएमडी (DFMD), १५ वॉकी-टॉकी, ३ एक्स-रे बॅगेज स्कॅनर आणि १ ड्रोन कॅमेरा यांचा वापरही केला जाणार आहे.
- एलईडी स्क्रीन: भाविकांना दर्शनाची माहिती मिळवण्यासाठी ११ ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
advertisement
अंबाबाईची आराधनेची रूपे
नवरात्रीच्या काळात देवीची आराधना विविध रूपांमध्ये केली जाते. दररोज देवीला वेगळा साज चढवला जातो.
- सोमवार (२२ ऑक्टोबर): श्री कमलादेवी
- मंगळवार (२३ ऑक्टोबर): श्री बगलमुखी
- बुधवार (२४ ऑक्टोबर): श्री तारा
- गुरुवार (२५ ऑक्टोबर): श्री मातंगी
- शुक्रवार (२६ ऑक्टोबर): श्री भुवनेश्वरी
- शनिवार (२७ ऑक्टोबर): अंबारातील पूजा
- रविवार (२८ ऑक्टोबर): श्री षोडशी त्रिपुरसुंदरी
- सोमवार (२९ ऑक्टोबर): श्री महाकाली
- मंगळवार (३० ऑक्टोबर): श्री महिषासुरमर्दिनी
- बुधवार (१ नोव्हेंबर): श्री भैरवी
- गुरुवार (२ नोव्हेंबर): श्री रुथारुड पूजा
अंबाबाई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मार्गांवर स्वागत कमानी उभारल्या आहेत. यामुळे मंदिर परिसर अधिक चैतन्यमय दिसत आहे. नवरात्रौत्सवादरम्यान अंबाबाई मंदिरातील सुरू असलेल्या कामांमुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गरुड मंडपाच्या उभारणीचे काम तात्पुरते थांबवून मुखदर्शनासाठी दोन ठिकाणी सोय करण्यात आली आहे, तसेच अभिषेक सोहळाही याच ठिकाणी होणार आहे.
मुखदर्शनाचे नियोजन : सध्या गरुड मंडपाचे बांधकाम सुरू असले तरी, नवरात्रीसाठी ते तात्पुरते थांबवले आहे.
- दोन ठिकाणी सोय : भाविकांसाठी गणपती चौकातून आणि गरुड मंडपाच्या महाद्वार बाजूकडून तात्पुरता जिना तयार करून मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे.
- ऊन-पावसापासून संरक्षण : मुखदर्शन रांगेतील भाविकांना ऊन आणि पावसापासून वाचवण्यासाठी मंडपाचे शेड उभारण्यात येत आहे.
गरुड मंडपात होणार अभिषेक : मंदिरातील विकासकामांचे साहित्य गरुड मंडपातून हटवण्यात आले आहे. त्यामुळे, नवरात्रीत होणारे देवीचे अभिषेक गरुड मंडपातच केले जातील. पालखी सोहळ्यावेळी देवी सदरेवर विराजमान होईल, जेणेकरून भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल
हे ही वाचा : Happy Navratri Wishes : घटस्थापना घटाची, नवदुर्गा स्थापनेची; अशा द्या नवरात्रीच्या शुभेच्छा