TRENDING:

 खळबळजनक! कोर्टाच्या बिल्डिंगमागे नदीत आढळली तरुणीची डेडबॉडी, अत्याचाराच्या संशयाने मोताळा पेटलं!

Last Updated:

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

बुलढाणा : मोताळा शहरात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गिट्टी खदान परिसरातील नदीच्या पात्रात न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस, एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

advertisement

मृत तरुणीची ओळख पटली असून काल सायंकाळपासून बेपत्ता होती. घरच्यांनी तिचा शोध घेतल्यानंतरही काहीही माहिती न मिळाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आज सकाळी काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास नदीच्या पाण्यावर तरंगणारा मृतदेह पडताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पथक तत्काळ दाखल झाले.

पोलिसांनी परिसराची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करत आहे. मृतदेहाची अवस्था आणि प्राथमिक निरीक्षणावरून तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

advertisement

शहरात तीव्र संतापाची लाट उसळली

या घटनेनंतर मोताळा शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

सखोल तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात
सर्व पहा

दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे. अल्पवयीन तरुणीवर झालेल्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी जोर धरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
 खळबळजनक! कोर्टाच्या बिल्डिंगमागे नदीत आढळली तरुणीची डेडबॉडी, अत्याचाराच्या संशयाने मोताळा पेटलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल