TRENDING:

हल्ला केला, गाडी फोडली; अखेर शिंदे गटाच्या उमेदवार पराभूत, अटीतटीच्या लढतीत गोपीचंद पडळकरांच्या वहिनी जिंकल्या

Last Updated:

निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या आहेत. माधवी पडळकर आणि  शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. विजयी उमेदवारांची नावं जाहीर होत आहे. भाजपचे फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी विजयी झाल्या आहे. आटपाडी जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार माधवी पडळकर यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आहे.
News18
News18
advertisement

आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या आहेत. माधवी पडळकर आणि  शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर विद्या मोटे काही वेळ आघाडीवर होत्या. पण, संध्याकाळी माधवी पडळकर यांनी आघाडी घेतली.

अखेरीस मतमोजणी अंती माधवी पडळकर विजय झाल्या आहे. माधव पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांचा फक्त 980 मतांनी पराभव केला. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहे. माधवी पडळकर यांच्या विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

advertisement

गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी फोडली होती विद्या मोटे यांची गाडी

दरम्यान, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला होता. आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली होती.  आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडला होता. शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणुकीच्या मैदानात होत्या.  प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदेसेनाच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली, यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला, यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हल्ला केला, गाडी फोडली; अखेर शिंदे गटाच्या उमेदवार पराभूत, अटीतटीच्या लढतीत गोपीचंद पडळकरांच्या वहिनी जिंकल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल