नुपूर यांना लहानपणापासून क्रियेटिव्ह गोष्टी करण्याची आवड होती. पण, शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स (बी.सी.ए) आणि मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स या दोन पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील एका नामांकित कॉलेजमध्ये नोकरी केली. मात्र, लग्नानंतर मुलाला संभाळण्याची जवाबदारी अंगावर आल्याने त्यांनी आपली नोकरी सोडली.
advertisement
नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या मनात व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. व्यवसायासाठी त्यांनी पूर्वीपासून आवड असलेल्या डिजिटल आणि ग्राफिक्स क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. नुपूर यांनी तीन वर्षापूर्वी 'एनीकॅचर बाय नुपूर' या नावाने स्वतःची डिजिटल कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला डिजिटल डिझाईन आणि लग्न पत्रिका तयार केल्या. हळूहळू नाशिकबाहेरूनही त्यांच्या कामाला लोकांची पसंती मिळू लागली.
सध्या नुपूर यांच्याकडे संपूर्ण देशभरातून आणि विदेशातूनही ऑडर्स येतात. डिजिटल डिझाईन्स, कंपनी इव्हेंट, डिजिटल गिफ्ट बॉक्स पॅकेजिंग इत्यादींच्या माध्यमातून त्या महिन्याला चांगली कमाई करत आहेत. लग्नसोहळ्यातील अनेक गोष्टी देखील कस्टमाईज करण्याचं काम नुपूर करतात. 'एनीकॅचर बाय नुपुर' या इन्स्टाग्राम पेजला भेट देऊन त्यांच्या कामाबद्दल माहिती घेता येऊ शकते.