आज या ब्रँडला सात वर्षं पूर्ण झाली असून, त्यांच्या ज्वेलरीचा खास अंदाज आणि दर्जा पाहता ग्राहकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोडस हे नाव इटालियन भाषेतून घेतले असून, त्याचा अर्थ आहे स्टाइल किंवा ट्रेंड आहे, असं पूर्वी मेहता सांगतात. यांना नेहमीच काहीतरी हटके आणि युनिक बनवायचं होतं आणि त्यामुळे त्यांच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये हँडमेड, ट्रेडिशनल, इंडो-वेस्टर्न अशा विविध शैलींचा समावेश केला.
advertisement
Food Business: क्वालिटी अन् कॉन्टिटी एक नंबर! बटाटा वडा नव्हे, मुंबईकर विकतोय चिकन वडापाव!
सुरुवातीला घरून छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा ब्रँड आता एका प्रोफेशनल स्टुडिओमध्ये रूपांतरित झाला आहे. दादरमध्ये त्यांनी तीन वर्षांपूर्वी स्वतःचा स्टुडिओ उभारला आणि आता त्यांचा ब्रँड केवळ मुंबईतच नव्हे, तर बेंगळुरूपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली ज्वेलरी सर्वत्र पोहोचवली असून, अनेक एक्झिबिशनमध्येही मोडसला विशेष स्थान मिळालं आहे.
आज त्यांचं मासिक उत्पन्न 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. आरती आणि पूर्वी यांचं मत स्पष्ट आहे की यश एक दिवसात मिळत नाही. व्यवसाय म्हणजे रोज नवीन शिकलं जातं, रोज नवे अनुभव येतात. काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळतो, पण तेच अनुभव पुढच्या टप्प्यावर उपयोगी पडतात. सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत हेच यशाचं गमक आहे. मोडसचा हा प्रवास नव्या पिढीतील उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.