TRENDING:

गरीबांचं मटण शेतकऱ्यांना करणार श्रीमंत, अशा पद्धतीने करा शेती अन् मग पाहा फायदा..

Last Updated:

शेतकऱ्यांनी हंगामानुसार भाजीपाल्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल. एप्रिलच्या सुरुवातीला शेतकरी सुरणची लागवड करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी
शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी
advertisement

रायबरेली : परंपरागत शेतीचा खर्च वाढल्याने शेतकरी आता इतर पर्याय शोधत आहेत. तसेच इतर शेतीचा मार्ग स्विकारत आहेत. शेतकरी आता भाजीपाला शेतीच्या माध्यमातून चांगली कमाई करताना दिसत आहेत. कमी वेळा तयार होणारे पीक असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या शेतीतून चांगला नफा मिळत आहे.

शेतकऱ्यांनी हंगामानुसार भाजीपाल्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल. एप्रिलच्या सुरुवातीला शेतकरी सुरणची लागवड करू शकतात. सुरणला उत्तरप्रदेश-बिहारसह अनेक राज्यांमध्ये ओल किंवा जिमीकंद म्हणूनही ओळखले जाते. सुरण ही आधी एक वन्य वनस्पती मानली जात होती. लोक घराच्या मागे किंवा पडीक जमिनीवर त्याची लागवड करायचे. तसेच ते जमिनीतून काढून सणासुदीला खायचे. मात्र, आता शेतकरी या सुरणची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत.

advertisement

याबाबत रायबरेली येथील खुशहाली कृषी संस्थेचे माजी व्यवस्थापक अनुप शंकर मिश्रा यांच्याशी संवाद साधला. अनुप शंकर मिश्रा यांना कृषी क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव आहे. लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, सुरणची लागवड एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. विधान आणि कुसुम सोबतच गजेंद्र प्रजाती सुरणचे सर्वात फायदेशीर वाण मानले जाते.

advertisement

याच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय खते आणि सिंचनाची योग्य सोय करावी लागेल. जुलै महिन्यापासून पावसाला सुरुवात होत झाली असली तरी त्यापूर्वी शेतकऱ्यांना सिंचनासाठी इतर साधनांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

भटकंतीची आवड असणाऱ्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचंय? तर मग या वस्तू आहे एकदम best

अनूप शंकर मिश्र पुढे म्हणाले की, एप्रिल महिन्यात पेरणी केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे 8 महिन्यात हे पीक तयार होते. सुरणाच्या लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती चांगली मानली जाते. तसेच लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्ण नांगरणी करावी लागेल. शेतातील जमिनीतून ओलावा काढून टाकल्यावर पुन्हा एकदा रोटाव्हेटरने नांगरणी करावी. यानंतर पेरणीच्या वेळी शेतकरी सुरणाचे तुकडे शेतात दोन फूट अंतरावर लावू शकतात. तसेच 2 किलो सुरणाचे चार भाग करून जमिनीच्या 1 इंच खाली खड्ड्यात लागवड केली जाते. सुरणाच्या लागवडीनंतर 20 ते 23 दिवसांत रोपे उगवायला लागतात.

advertisement

शेती करण्याआधी ही माहिती नक्की घ्या -

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सुरणाची शेती करण्याआधी याच्या बियाण्याचा अभ्यास करावा. यासाठी एका ड्रममध्ये 15 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून त्यात सुरणाच्या बिया टाका. तसेच 10 मिनिटांनी बाहेर काढा. ही प्रक्रिया तीन वेळा केल्याने बिया शुद्ध होतात. त्यामुळे रोगाचा धोकाही कमी होतो.

advertisement

एका हेक्टरमध्ये किती उत्पादन -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कारल्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा खास रेसिपी, एकदम खाल आवडीने, Video
सर्व पहा

अनूप शंकर मिश्र हे सांगतात की, एप्रिल महिन्यात पेरणी केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पीक तयार होते. एक हेक्टरमध्ये सुमारे 140 क्विंटल बियाणे लावले जाते तसेच या माध्यमातून तब्बल 500 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. नोव्हेंबर महिन्यात लोकांना सुरण खायला खूप आवडते. त्यामुळे बाजारात 40 रुपये किलो दराने त्याची सहज विक्री होते. सुरणाला गरिबांचे मटण असेही म्हणतात.

मराठी बातम्या/मनी/कृषी/
गरीबांचं मटण शेतकऱ्यांना करणार श्रीमंत, अशा पद्धतीने करा शेती अन् मग पाहा फायदा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल