भटकंतीची आवड असणाऱ्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचंय? तर मग या वस्तू आहे एकदम best
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आजच्या काळात, अनेकांना विविध ठिकाणी फिरायला, प्रवास करायला आवडते. जर तुमच्याही कुणा मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा मग कुटुंबातील सदस्यांना प्रवासाची आवड असेल आणि तुम्हाला त्यांना काही गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही त्यांना नेमकं काय गिफ्ट करावं, हे आज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत. या गिफ्टमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ करू शकता. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
ट्रॅव्हलिंग टेंट : जर तुमचा कुणी मित्र नवीन लोकेशनवर जात असेल आणि तुम्हाला त्याला काही गिफ्ट करायचं असेल तर त्याला तुम्ही ट्रॅव्हलिंग टेंट भेट देऊ शकता. हे त्याला खूप आवडेल आणि त्याच्या कामातही येईल. मार्केटमध्ये तुम्हाला अनेक ट्रॅव्हलिंग टेंट मिळतील. तुम्ही त्यांना सिंगल किंवा डबल ट्रॅव्हलिंग टेंट गिफ्ट करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे, त्या ट्रॅव्हलिंग टेंटचे वजन कमी असावे. यामुळे त्याला कॅरी करायला त्रास होणार नाही.
advertisement
advertisement
ट्रेकिंग बूट्स : जर तुमच्या मित्र मैत्रिणीला किंवा कुटुंबातील सदस्याला ट्रेकिंगला जायला आवडत असेल तर तुम्ही त्यांना ट्रेकिंग बूट भेट देऊ शकता. डोंगरात सुरक्षित ट्रेकिंगसाठी ट्रेकिंग बूट खूप महत्त्वाचे आहेत. सध्या बाजारात अनेक प्रकारचे ट्रेकिंग बूट सहज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, स्पाइक असलेले बूट ट्रेकिंगसाठी बेस्ट मानले जातात.
advertisement