बाराबंकी : भारत हा कृषीप्रधान देश आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, हे तुम्हाला माहिती असेल. पण वेळेनुसार शेतीमध्येही काही बदल केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. जर शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती केली, तर त्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो, हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. आज अशाच एका प्रगतीशील शेतकऱ्याबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
अशा अनेक भाज्या आहेत, ज्यांची शेती करुन शेतकरी चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करुन लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न कमावत आहेत. बाराबंकी जिल्ह्यातील एक असे शेतकरी जे गाजर, टोमॅटो, शिमला मिरची यासह अनेक भाजीपाल्याची शेती करत आहेत आणि या माध्यमातून प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत. त्यांची शेती पाहून इतर शेतकरीही त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.
संदीप असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते बिहार राज्यातील बंकी परिसरातील शुक्लाई गावातील रहिवासी आहेत. संदीप यांनी चार वर्षांपूर्वी भाजीपाल्याची शेती करायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांना चांगला आर्थिक लाभ होऊ लागला.
वर्षाला लाखोंची कमाई -
आज संदीप हे तीन ते चार बिघा शेतीच्या माध्यमातून गाजर, टोमॅटो आणि इतर भाजीपाला शेती करत आहे. यामाध्यमातून त्यांना प्रत्येक वर्षाला दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळत आहे. मी गाजर, टोमॅटोची शेती एक बिघा क्षेत्रातून सुरू केली होती. यामध्ये मला चांगला नफा मिलाला. यासाठी मला 10 ते 12 हजार रुपये प्रतिबिघा खर्च आला. त्याचबरोबर एका पिकाच्या माध्यमातून मला 2 ते 2.5 लाख रुपये नफा सहज मिळतोय, असे त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.