मुलांची स्मरणशक्ती computer पेक्षाही वेगवान हवी? तर बाळाच्या जन्मानंतर लगेच करा हे काम, राहू केतूच्या प्रभावापासूनही होईल बचाव
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पौराणिक मान्यता अशीही आहे की, असे करण्यामागे एक महत्त्वाचे कारण होते. ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हा संस्कार केल्याने बाळाची स्मरणशक्ती वाढवली जात होती.
गुलशन कश्यप, प्रतिनिधी
जमुई : प्राचीन काळापासून बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर विविध संस्कार केले जातात. गर्भधारणा झाल्यावरच बाळावर केले जाणाऱ्या संस्काराला सुरुवात होते. यामध्ये एक संस्कार असा होता, जो बाळाची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केला जायचा. इतकेच नव्हे तर या संस्काराच्या माध्यमातून बाळाच्या आयुष्यात येणारे सर्व संकटं आणि राहू केतूच्या प्रभावालाही दूर केले जात होते. तुम्हाला हा संस्कार कोणता आहे, हे माहिती आहे का? नसेल माहित तर तेच आपण आज जाणून घेऊयात. तसेच कोणत्या वयात हा संस्कार करणे योग्य आहे, हेसुद्धा जाणून घेऊयात.
advertisement
का केला जात होता हा खास संस्कार -
16 संस्कारांमध्ये एक कर्णवेध संस्कारही आहे. यामध्ये बाळाचे कान टोचले जातात. पौराणिक मान्यता अशीही आहे की, असे करण्यामागे एक महत्त्वाचे कारण होते. ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कर्णवेध संस्कार केल्याने बाळाची स्मरणशक्ती वाढवली जात होती.
advertisement
या कारणामुळे प्राचीन काळी मुलांचे कान टोचले जायचे. तसेच यामागे एक ज्योतिषी कारणही होते. असे सांगितले जाते की, कान टोचल्याने बाळावरील राहू आणि केतूचा प्रभाव नष्ट व्हायचा. वाईट आत्माही त्याच्यापासून दूर राहतात. आजकाल लोक फॅशन म्हणून कान टोचतात. मात्र, आधीच्या काळी मुलांचे कान टोचणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते.
advertisement
ज्योतिषाचार्य यांनी सांगिले की, विशेष म्हणजे यासोबतच कान टोचण्यामागे एक वैज्ञानिक कारणही लपलेले आहे. असे मानले जाते की, कान टोचल्याने मुलांचे मेंदू तीक्ष्ण होतो. यामुळे दृष्टीही वाढते. कान टोचण्याचे सर्वोत्तम वय हे मुलांच्या जन्मानंतरच्या दहाव्या, बाराव्या, सोळाव्या दिवशी किंवा सहाव्या, सातव्या किंवा आठव्या महिन्यात केले जाऊ शकते. याशिवाय शून्य ते तीन आणि पाच ते सात वर्षे वयाच्या मुलांचे कान टोचले जाऊ शकतात. प्राचीन काळी मुले जेव्हा गुरुकुलात जायची तेव्हा त्यांचे कर्णवेद संस्कार केले जायचे, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना - ही बातमी ज्योतिषाचार्य यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Jamui,Bihar
First Published :
March 13, 2024 9:44 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मुलांची स्मरणशक्ती computer पेक्षाही वेगवान हवी? तर बाळाच्या जन्मानंतर लगेच करा हे काम, राहू केतूच्या प्रभावापासूनही होईल बचाव