Health News : बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

Last Updated:

Health News : एका दुर्मिळ आणि असाधारण वैद्यकीय केसमध्‍ये मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला.

News18
News18
एका दुर्मिळ आणि असाधारण वैद्यकीय केसमध्‍ये मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला. ज्यामुळे तीन महिन्‍यांपासून त्‍याला सतत खोकला आणि श्‍वसनाचा होत असलेला त्रास अखेर दूर झाला. राहुल (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) सुरुवातीला निदान झालेल्या न्‍यूमोनिया आजाराने ग्रस्त होता आणि अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर देखील, त्याची लक्षणे कायम राहिली. त्यामुळे त्‍याची पुन्हा एकदा तपासणी करण्‍यात आली, ज्यामध्ये सीटी स्कॅन करण्‍यात आले.
या सीटी स्कॅनमध्ये त्‍याच्‍या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आला. कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्‍नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले, जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्‍यात आलेला एलईडी बल्‍ब ब्रोन्कस मध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले. ॲनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले.
advertisement
या केसबाबत मत व्‍यक्‍त करत जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्‍हणाले, "आम्‍ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्‍ये खोलवर गेला होता आणि समकालीन उपचार पद्धती तो बल्‍ब बाहेर काढण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरल्‍या. काळजीपूर्वक नियोजन केलेल्या मिनी थोरॅकोटॉमीसह आम्‍ही सुरक्षितपणे एलईडी बल्‍ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले." ईएनटी सर्जन डॉ. दिव्य प्रभात म्‍हणाल्‍या, "मुलांमध्ये अस्पष्ट आणि सतत दिसणाऱ्या श्‍वसनसंबंधित लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामुळे अनेकदा न्यूमोनिया किंवा इतर सामान्य आजारांमुळे अशा केसचे निदान होण्यास विलंब होतो. प्रगत इमेजिंगद्वारे लवकर निदान केल्यास परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि गुंतागूंत टाळता येऊ शकते."
advertisement
या केसमधून मुलांमुधील गुंतागूंतीच्‍या श्‍वसनसंबंधित केसेसचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये लवकर निदान, प्रगत इमेजिंग आणि स्‍पेशलिस्‍ट हस्‍तक्षेपाचे महत्त्व दिसून येते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या आरोग्यावरील प्रश्न उद्भवत आहे. लहान मुलं खेळत असताना आपला मुलगा काय खेळतोय? तो खेळत असताना कोणतीही गोष्ट तोंडात तर टाकत नाही ना? अशा अनेक मुद्द्यांकडे आई- वडिलांनी लक्ष द्यायला हवे. शिवाय लहान मुलं खेळत असताना त्यांना सहसा तरी गुळगुळीत खेळणं देणं टाळलं पाहिजे. आई- वडिलांनी या मुद्द्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
मराठी बातम्या/मुंबई/
Health News : बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब, कोल्हापूरातील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement