JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 120 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
RBI Grade B Application 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिसर पदांसाठी नोकरभरती आहे. सध्या जे तरूण सरकारी नोकरीच्या शोधामध्ये होते, त्यांच्यासाठी ही नोकरी फार महत्त्वाची आहे.
अनेक तरूणांचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India) नोकरी करण्याचं स्वप्न असतं. ज्यांचं आरबीआयमध्ये जॉब करण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिसर पदांसाठी नोकरभरती आहे. सध्या जे तरूण सरकारी नोकरीच्या शोधामध्ये होते, त्यांच्यासाठी ही नोकरी फार महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये कोणकोणत्या पदांसाठी नोकर भरती आहे? कोणकोणत्या विभागासाठी नोकर भरती आहे? शैक्षणिक पात्रता किती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काही तासांपूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने नोकरीबद्दल अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये 'गट- ब'मधील ऑफिसर पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. 10 सप्टेंबरपासून नोकरभरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार असून अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर असणार आहे. अर्जप्रक्रियेला सुरूवात 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेपासून होणार आहे. अर्ज करण्याचा आणि परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्घतीने करू शकता. अर्जप्रक्रिया, अर्जाचे शुल्क आणि परीक्षा या तिनही गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
advertisement
नोकरभरतीसाठी उमेदवारांना https://rbi.org.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जप्रक्रिया सुरू होताच लगेचच तात्काळ अर्ज भरावा. आरबीआयमध्ये ग्रेड बी पदांसाठी एकूण 120 जागांची भरती करणार आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये जनरल, DISM, DEPR विभागात ही भरती केली जाणार आहे. चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. आरबीआय ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.
advertisement
इकोनॉमिक्स, फायनान्समध्ये मास्टर्स, पीजीडीएम किंवा एमबीए डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वयोगटातील असावे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परिक्षेच्या माध्यमातून केले जाणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे.१८- १९ ऑक्टोबर या कालावधी फेज १ परीक्षा होणार आहे. त्यानंतर ६-७ डिसेंबर रोजी फेज २ परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी परीक्षेची तयारी करावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 7:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 120 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती