Nepal : एकमेव त्रिकोणी ध्वज, असं काय आहे त्यात खास? ज्यामुळे नेपाळला जगात मिळाली वेगळीच ओळख
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या देशाचा राष्ट्रीय ध्वज हा आयताकृती किंवा चौकोनी नसून तो थेट त्रिकोणी आहे.
advertisement
advertisement
advertisement
नेपाळच्या ध्वजात दोन एकमेकांवर ठेवलेले त्रिकोण दिसतात. हे त्रिकोण हिमालय पर्वतरांगांचे प्रतीक मानले जातात. तसेच ध्वजामध्ये असलेले सूर्य आणि चंद्राचे चिन्ह नेपाळी संस्कृतीत अमरत्व, स्थैर्य आणि शांती यांचे प्रतीक आहे. सूर्य-चंद्राच्या उपस्थितीमुळे नेपाळचे अस्तित्व सदैव टिकून राहील, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते.
advertisement
advertisement
1962 मध्ये नेपाळने आपला ध्वज अधिकृतरित्या मान्य केला. आज संयुक्त राष्ट्रसंघापासून ते विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर नेपाळचा त्रिकोणी ध्वज सहज लक्ष वेधून घेतो. प्रत्येक देशाचा ध्वज वेगळेपण सांगतो, पण नेपाळच्या ध्वजामुळे "भौमितिक विविधतेतही राष्ट्रीय अभिमान कसा सामावू शकतो" याचे उत्तम उदाहरण जगासमोर येते.
advertisement
advertisement