Vice President : उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? भारत सरकारकडून घरासह काय काय सुविधा मिळतात?

Last Updated:

अनेकांना हा प्रश्न पडतो की उपराष्ट्रपतींना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांना राहण्यासाठी कुठे घर दिलं जातं?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतामध्ये उपराष्ट्रपती पद हे देशातील दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद आहे. तर राष्ट्रपती हे देशातील पहिले पद आहे. 6 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकीत NDAचे उमेदवार C. P. Radhakrishnan यांना 452 मत मिळाली, तर त्यांच्या विरोधी INDIA ब्लॉकच्या उमेदवार B Sudershan Reddy यांना 300 मत मिळाली. त्यांची या पदासाठीची निवड जाहिर करण्यात आली आहे आणि ते आता भारताचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आहेत.
या सगळ्यात अनेकांना हा प्रश्न पडतो की उपराष्ट्रपतींना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांना राहण्यासाठी कुठे घर दिलं जातं?
उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण उपराष्ट्रपतींना थेट पगार दिला जात नाही. त्याऐवजी ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून दरमहा सुमारे 4 लाख रुपये मानधन घेतात. हा पगार संसदेतील अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम, 1953 नुसार निश्चित केला जातो.
advertisement
मग प्रश्न असा की त्यांना सरकारकडून कार्यकाल संपेपर्यंत निवास स्थान मिळतं का?
उपराष्ट्रपतींसाठी दिल्लीतील 6, मौलाना आजाद रोड येथील अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते. हा सरकारी बंगला आहे आणि त्यात सर्व आधुनिक सोयी-सुविधा असतात.
घरासोबतच उपराष्ट्रपतीला कोणकोणत्या सुविधा मिळतात?
त्याचा घर सांभाळणं आणि घराची देखभाल देखील सरकारकडून केली जाते. वैद्यकीय सेवा चांगल्यापद्धतीच्या मिळतात. रेल्वे आणि हवाई प्रवासासाठी मोफत सुविधा, लँडलाइन आणि मोबाइल सेवा मिळते. शिवाय वैयक्तिक सुरक्षा आणि स्टाफ देखील मिळतो.
advertisement
निवृत्तीनंतरच्या सुविधा
उपराष्ट्रपतींना निवृत्तीनंतरही दरमहा सुमारे 2 लाख रुपये पेन्शन, टाइप-8 बंगला, वैयक्तिक सचिव, अतिरिक्त सचिव, वैयक्तिक सहाय्यक, डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि चार सहाय्यक दिले जातात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Vice President : उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? भारत सरकारकडून घरासह काय काय सुविधा मिळतात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement