रायबरेली : असं म्हणतात की, जर मेहनत करायची तयारी असेल तर प्रामाणिकपणे सातत्याने काम केले तर यश नक्कीच मिळते, हे एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. मोहम्मद शमीम असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने जे कार्य केले, ते इतरांसाठी आज प्रेरणादायी ठरत आहेत.
मोहम्मद शमीम हे पोल्ट्री फार्म बांधून कुक्कुटपालन करतात. यातून त्यांना कमी खर्चात चांगला नफाही मिळत आहे. याशिवाय त्यांनी गावातच अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मोहम्मद शमीम हे उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील शिवगढ परिसरातील रहिवासी आहेत. मोहम्मद शमीम हरियाणात रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे. मात्र, नंतर त्यांना हे काम करावेसे वाटले नाही.
advertisement
ते हरियाणात असताना एके दिवशी पोल्ट्री फार्मवर कामाला गेले होते. त्याठिकाणी काम करताना आपण पुन्हा गावी जाऊन कुक्कुटपालन का करू नये, असा विचार आला. यानंतर या विचाराने त्यांचे आयुष्यच बदलले. जो व्यक्ती कालपर्यंत इतरांसाठी रोजंदारीवर काम करत होता तो आज तो स्वतः इतरांना रोजगार देत आहे.
80 रुपये उधार घेऊन झाली लिज्जत पापडची सुरुवात, पहिली कमाई फक्त 50 पैसे, आज सर्वत्र आहे मागणी
लोकल18 सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, तेथून परतल्यावर गावात कुक्कुटपालन सुरू केले. आता ते घरी बसून वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. यासोबतच या व्यवसायाच्या माध्यमातून गावातच अर्धा डझनहून अधिक लोकांना रोजगारही देत आहे. हरियाणातून परत आल्यावर त्यांच्याकडे कुक्कुटपालन करण्यासाठी पैसे नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर अर्धा एकर जमिनीवर कुक्कुटपालन सुरू केले. अर्धा एकर जमिनीत 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. पण यातून वार्षिक उत्पन्न 3 ते 4 लाख रुपये आहे, असे त्यांनी सांगितले.
मोबाइलवरुन होते विक्री -
शमीम यांनी पुढे सांगितले की, विक्रीसाठी त्यांना कुठेही जावे यावे लागत नाही. त्यांचे सर्व काम हे मोबाईलवर होते. मोबाइलवर बुकिंग केल्यानंतर शेतातूनच खरेदीदार मालाची खरेदी करतात, असे त्यांनी सांगितले.
